शबनम
आज शबनम दिसली नाही म्हणुन ,बाईंनी तीच्या जवळ बसणारया गीता ला विचारल,ती का आली नाही? तेव्हा गीता म्हणाली ,बाई काय माहीत ,ती बरयाचदा अपसेंन्ट असते. दोन दिवसांनी शबनम काँलेजला आली, बाईंनी विचारल का आली नव्हती दोन दिवस? शबनम ने आजारी असल्याच कारण दिल. शबनम अभ्यासात अतीशय हुशार होती पण ती नेहमीच हरवलेली ,नाराज ,उदास असायची. एक दिवस ती अचानक वर्गात चक्कर येउन पडली ,बाईंनी मुलींच्या मदतीने तीला स्टाफ रुम मध्ये नेल.तीची वाईट अवस्था बघुन ,बाईंनी जवळ राहणारया ओळखीच्या डाँक्टरांना बोलवल. डाँक्टरांनी तपासल्यावर तीला अशक्त पणामुळे चक्कर आली अस सांगीतल. तीला तीथेच आराम करायला सांगुन बाई त्या डाँक्टरांना घेउन आपल्या केबीन मध्ये गेल्या , तीथे डाँक्टरांनी शबनम ला दिवस गेल्याच बाईंना सांगीतल. हे एकून बाईंना एकदम धक्काच बसला. आज बाई शबनमला स्वत: घरी सोडायला गेल्या. बाईंनी तीच्या घ...