शबनम

      आज शबनम दिसली नाही म्हणुन ,बाईंनी तीच्या जवळ बसणारया गीता ला विचारल,ती का आली नाही? तेव्हा गीता म्हणाली ,बाई काय माहीत ,ती बरयाचदा अपसेंन्ट असते.
           दोन दिवसांनी शबनम काँलेजला आली, बाईंनी विचारल का आली नव्हती दोन दिवस?
    शबनम ने आजारी असल्याच कारण दिल.
     शबनम अभ्यासात अतीशय हुशार होती पण ती नेहमीच हरवलेली ,नाराज ,उदास असायची.
         एक दिवस ती अचानक वर्गात चक्कर येउन पडली ,बाईंनी मुलींच्या मदतीने तीला स्टाफ रुम मध्ये नेल.तीची वाईट अवस्था बघुन ,बाईंनी जवळ राहणारया ओळखीच्या डाँक्टरांना बोलवल.
          डाँक्टरांनी तपासल्यावर तीला अशक्त पणामुळे चक्कर आली अस सांगीतल. तीला तीथेच आराम करायला सांगुन बाई त्या डाँक्टरांना घेउन आपल्या केबीन मध्ये गेल्या ,
 तीथे डाँक्टरांनी शबनम ला दिवस गेल्याच बाईंना सांगीतल.
हे एकून बाईंना एकदम धक्काच बसला.
             आज बाई शबनमला स्वत: घरी सोडायला गेल्या.
बाईंनी तीच्या घरी कोण कोण असत अशी चौकशी केली तर शबनम त्यांना आतल्या खोलीत घेउन गेली.
    आतल्या खोलीत साधारण पस्तीशीतली बाई खाटीवर झोपलेली होती. गोरीपान ,नाकीडोळी रेखीव,अतीशय सुदंर अशी पण अंथ्रुनाला खीळलेली ती शबनमचा आई होती.
  आपल्या खोलीत कुणीतरी आल्याची चाहुल लागताच ती जागी झाली,शबनम ने आपल्या अम्मीशी बाईंची ओळख करून दिली.
      रेहाना ,शबनम च्या अम्मीच नाव ,रेहाना ने हसुन बाईंच स्वागत केल व ती ही टिचर आहे इस बाईंना सांगीतल.
  तीच्या बोलण्यावर बाईंनी प्रश्वार्थक नजरेने शबनम कडे पाहील,तर ती म्हणाली, हो, अम्मी मुलानां उर्दू शीकवते.
   ती कुराणातल्या आयत त्यांना समजवते.
    बाई नीं तीला वडीलां बद्दल विचारले.तर ती म्हणाली ते एक दुकान चालवतात.
        बाई शबनमला उद्या त्यांना केबीन मध्ये येउन भेटायच ,सांगून निघुन जातात.
         शबनम सकाळी जरा लवकरच काँलेज मध्ये येते .आल्या आल्या ती प्राचार्य बाईंच्या केबीन मध्ये त्यांना भेटायला जाते.
    बाई बेल वाजवुन चपराश्याला सुचना देतात की ,थोडा वेळ कुणालाच आत येउ देउ नको.
       शबनम निर्वीकारी पणे त्यांच्या समोर बसलेली असते.
त्या तीच्या अगदी जवळ बसतात व तीच्या खांद्यावर हात ठेउन तीला  बोलत करायचा प्रयत्न करतात.
      बाई तीला काल डाँक्टरांनी त्यांना सागीतलेली तीच्या गरोदर पणा ची बातमी देतात व तीच कुणावर प्रेम आहे का अस विचारतात?
   बाईंच बोलण एकुन शबनम रडायला लागते व अचानक भानावर येत स्वताला सावरायचा प्रयत्न करते.
         बाई तीला परत म्हटल्या बोल शबनम काय झाल?हे तुझ्या अम्मीला कळल तर तीच काय होईल?
      सांग बेटा,मी तुला मदत करेल ,सांग ना काय झालय?
मला माहीत आहे तू चुकीच वागणार नाही.
     शबनम थोडी आश्वस्त झाल्यावर बोलायला  लागली.
 " मँडम माझी अम्मी गेली चार वर्ष झाले आजारी आहे. आधी महीना दोन दोन महीने ती दवाखान्यात होती ,पण पुढे तीच्यात फारशी सुधारणा न दिसल्याने व बील वाढतय म्हणुन तीला घरी आणल. तेव्हा पासुन ती खाटीवरच आहे. "
    "मी तेव्हा पासुन सगळ काम करते. तीच खाणपिण ,तीची स्वच्छता हे सगळ मीच करते."
     " माझे अब्बू बरेच दिवस तीची  काळजी घ्यायचे पण हळुहऴु त्यांना तीचा राग यायला लागला,मग ते घरी दारू पिउन यायला लागले.
     असच एक दिवस ते माझ्या खोलीत आले व दार बंद करून त्यांनी ------"
     " मी रडायला लागले,चीडले तर त्यांनी मला धमकी दिली की मी त्यांच एकल नाही तर ते अम्मीला मारून टाकतील.मला शिकू देणार नाही."
     "तेव्हा पासुन हे असच चालु आहे"
    शबनमच बोलण एकून बाई सुन्न झाल्या ,या तून तीला कस बाहेर काढायच त्यानां सुचानास झाल.
         त्यांनी त्यांच्या एका समाजसेवीका असलेल्या मैत्रीणीला हे सांगीतल .
      त्यांनी रीतसर महीला आयोगा कडे तक्रार केली.शबनम च्या मेडीकल नंतर तीच्या वडीलांना अटक झाली .
    तीला व तीच्या अम्मीला सावरायला थोडा वेळ लागला पण त्या दोघी आत्ता "सुकून "भर ी जिंदगी जगताहेत.


      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)