मृगतृष्णा
"अश्विनी येना ",अश्विनी अश्विनी .आली येकदची ती.चैन पडेना तीच्या शिवाय. आज अनेक दिवसांनी अजिंक्य तिला असा आवाज देत होता.कळी खुलली,गालवर लाली आली. आज त्यांच्या लग्नाला पूर्ण दोन वर्ष झाली.आजच्या च दिवशी तिन त्याच्याशी लग्न केल होत. ती त्याला एका क्लास मधे भेटली होती. कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांच्या ग्रुपला डांस करायचा होता.त्यात अजिंक्य तिचा पार्टनर होता.दोघांची तुलना करायची असेल तर ती व तो दोघ हि सुन्दर नाचायचे, प्रेसेंटेबल होते.पण एक फरक असा की आश्विन च लग्न झाल होत व अजिंक्य अजून ब्याचलर होता. एक दिवस तिथे कुणाल आला,आश्विनीचा नवरा.त्याच्या सोबत तिचे वडील ही होते. तिला त्यांनी बाहेर बोलवल. वडिलांनी तिला आत्ताच्या आत्ता घरी चल म्हटल,तर कुणाल तिला हे सगळं नाचण वगैरे सोडुन दयायल सांगत होता.अश्विनी त्यानां मी कहीच सोडणार नाही आणि तुमच्या सोबत तर मुळीच येणार नाही अस सांगत होती. तिच्या नकाराने वडीलांनी तिला एक गालात ठेऊन दिली आणि कुणाल तिला दंडाने पकडून ओढत न्यायला लागला.अश्विनी स्वतला सोडवण्याचा प्रयत...