प्यार के साईड इफेक्ट
रात्री शेजारी बरीच आरडा ओरड चालू होती . भांडी फेकण्याचे आवाज , आदळ आपट ,लेकरांची रडारड. हे दोन चार दिवसात होतच रहायच . योगेशच असच चालायच .तसा तो रोजच दारू पिऊन यायचा .कधी कधी फारच गोडीत चालायच सगळ बायको वर प्रेमाचा वर्षाव,लेकरांचे लाड.अन कधी त्याच्यात राक्षस संचारायचा मग तो मीनाला, त्याची बायको मारमार मारायचा .केस धरून डोक भिंतीवर,दारावर आपटायचा.सीगरेट चे चटके , शिव्यातर विचारूच नका .मधे पडणारया माणसा ला ही तो सोडत नव्हता .तीची बाजू घेणारया पूरषांवर संशय घ्यायचा,बायकानां ही नाही तस बोलायचा मग मीनाच सगळ्यानां त्याच्यांत पडू नका म्हणूव सांगायची.
त्याही दिवशी बरीच रात्र झाली म्हणून सगळेच आपापल्या घरात जाऊन झोपले पण आतही बराच वेळ गोधंळ चालू होता.
सकाळी रोजच्या सवईने समोर दूध आणायला गेले तर मीना सोनू आणि चिंटू ला घेऊन येत होती . मग हळू हळू दोघी तिघी जमल्या .मीना ला विचारल येवढ्या सकाळी तू कुठे गेली होतीस ?
तर तीन आंवढा गिळून बोलायचा प्रयत्न केला ,सगळ्यानीं तिला धीर दिला ,रात्री पासून भुकेली मुल आई कडे खायला मागत होती ,मग जोशी बाईनीं त्यांच्या हातात बिस्कीट दिलीत .
मूलं बाजूच्या पायरयांवर जाऊन बसली .तशी मीना हूदंके देवून रडायला लागली . सीमान तीला जवळ घेतल ,शांत केल.मग मीना सांगायला लागली की ,योगेशन रात्री तिला व मूलानां बाहेर काढून दिल व दार लाऊन घेतल. मग ती आणि मूल रात्रभर इकडे तीकडे फिरत होती. गस्त घालणारया पोलीसानीं विचारल गावाहून आलोय अस सांगीतल.आत्ता मूलानां शाळेत पाठवायचय अस म्हणून ती घराकडे गेली.
ग्रेटच आहे मीना ,रात्री एवढ सगळ घडल तरी ती किती प्रॅक्टीकल आहे.अस मी बोलले तर जोशी बाई म्हटल्या अग काय करेल ती? सहन करण्या शिवाय पर्यायच नाही तिच्या कडे .हे सगळ तीच्या च चुकीच फळ भोगतेय ती.
अग तीने म्हणे प्रेम विवाह केलाय म्हणजे लव्ह मॅरेज.
मला प्रश्न पडला मीना अन योगेश मध्ये बरच अतंर आहे अन तो असा काही विशेष पण नाही दिसत.
असो प्रेम आंधळ असत अस म्हणून तो विषय तिथे संपला.
दूपारी कडू बाई कामाला आली तशी ती जरा शांतच होती.पण आजी च्या प्रश्नाने ती बोलायला लागली ."आजी पोरी नसत्या प्रेमाच्या फंदात पडतात अन सगळी नाती तोडून स्वत:च नूकसान तरून घेतात."
आजी ला तीचा त्रागा फारसा कळला नाही ,म्हणून आजीनी विचारल ,"कडू काय झाल बडबडायला ,तुझ्या पोरीन काही केलय का?"
"नाही ओ आजी ,मीना बाईची आई आली हाय ,त्यांच बोलन कानावर पडल "
मीना ची आई साधारण चाळीशी पार केलेली .शिक्षाका आहे शाळेत . मीना काॅलजात असतानां तीच आणि एका शिक्षकाच काही तरी चालू आहे अशी कूनकून घरी लागली ,वडील मोठी शेती असलेले राजकारणी .त्या मूळे अधिक बदनामी नको म्हणून मीनाला घरी बसवल व त्याला म्हणजे योगेश ला समज दिली .
मीनाच वय तस अल्लड पण तीन आई वडिलांच ऐकल आणि आपल्या आभासा कडे वळली .इकडे योगशच ही घरच्यांनी लग्न करून दिल.
आता सगळ नीट होतय अस वाटत असतानाच एक दिवस योगेश मीनाला भेटला व ती त्याच्या सोबत आली नाही तर जीव देइन म्हणाला ,तीन नकार देताच त्यान हाताची नस कापली ,झाल मीना फसली व त्याच्या सोबत कूणालाही न सागता पळून गेली.
गावात बराच गोधंळ झाला ,मूलींकडची मंडळी योगेशच्या घरच्यांना या साठी जबाबदार ठरवू लागली .
प्रकरण कोर्टात गेल,बरीच पेपर बाजी झाली.दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप.
ज्यांच यात काहीच घेण देण नव्हत ती सगळी माणस यात भरडली जात होती.
इकडे मीना व योगेशच ही काही फार चांगल चालल होत अस नाही.एका खोलीत मोजून चार भांडी ,एक गादी,माठ व कपड्याची एक सूटकेस .
दोघ ही सुखवस्तू घरातली पण आता वाळीत टाकलेली.
थोड्या दिवसांनी योगेश ची लग्नाची बायको तिथे येते.त्याला विणवन्या करते की मी सगळ काम करीन पण मला इथे राहू द्या .
शोभा योगेशची बायको त्या दोघांच लग्न लावून देते .तीच मीना ला मनी मंगळसूत्र करून देते.
सवत माझी लाडकी करत ती मीना ला जपते.सगळी काम स्वत: करते. अश्यात एक दिवस शोभाचे वडील येतात व सगळा तमाशा बघून तीला घेवून जातात.
बरीच वर्ष यांच्याशी दोन्ही कडची माणस संबध तोडून टाकतात , तेव्हा दोघच एकमेंका साठी असतात . छोटासा पण सुखी संसार चालू असतो.
हळू हळू योगेश कडे त्याच्या घरच्यांच जानयेण चालू होत. नात्यातल्या लग्नात हजेरी लागायला लागते पण मीनाला अजून कूणी मना पासून स्वीकारलेल नसत.
ती ते सहन करत त्याच्यांत आधार ,आपूलकी शोधत राहते.
इकडे योगेश ला कुटूंब मीळत पण तो मीनाला त्रास द्यायला लागतो. इकडचा आधार मिळाल्याचा अभीमान अन त्याच्या पासून तुटलो मीना मुळे म्हणून तीचा राग राग करायला लागतो. दारूच व्यसन व तीला शीवीगाळ ,मारहाण. मीना हेल्पलेस होते.
पण कस तरी तीच्या माहेरी कळत आणि आज तीची आई आली .
मीना ला आई तीच्या सोबत चल म्हणते पण योगेश च्या विचीत्र स्वभावाने ती जायच नाकारते .तीला वाटत ती जीथे जाईल तिथे येऊन हा ॆगोंधळ घालेल ,लोकानां त्रास देईल. मी
इथे राहीली तर फक्त मलाच त्रास होईल.या सगळयात ती ची स्वत: ची मुल व संसार सांभाळायचा ती पूर्ण प्रयत्न करतेय. इतक ती कस सहन करते कुणास ठावूक एखादी जीव देवून मोकळी झाली अलती.
आत्ता तिच्या संघर्षाची ,सहनशीलतेची ,मेहनतीची फळ तीला मीळायला लागलीयेत But steel she is fighting & strugling because of her imature love.
आता आणखी एक गोष्ट ऐकूया .
प्रीया आणि सचिन ची .दोघ मेडीकल स्टूडंट .बरीच डाॅक्टर मंडळी इतकी वर्ष सोबत राहून प्रेमात पडतात.
तसच यांच झाल .प्रीया खरच आँलराऊंडर होती. सचिन दुसरया जातीचा असला तरी तीला योग्य वाटत होता. इकडे वडीलांनी शिक्षक असलेल्या आत्येभावाच स्थळ सुचवल पण हा डाँक्टर व डँशिंग म्हणून तीन त्याच्याशीच लग्न केल.
तीन त्याच्या घरच्यांची मन जींकली . दोघांची सोबत प्रॅक्टीस चालू होती.मूल झाली .प्रीया चांगल लिहायची .तीचा आवाजही उत्तम होता .त्याचा संसार सांभाळतानां तीन तीचसगळ बाजूला ठेवल.
अचानक ऐक दिवस तीला सचिनच्या दूसरया बायको बद्दल कळत आणि ती पार कोसळते.
पण सचिन उलट तीलाच मारहाण करतो व शांत रहा म्हणतो. प्रीया जख्मी वाघीणी सारखी चवताळते . नवरयाची वाटणी तिला सहन होत नाही.ती पोलीसात जाते मग कोर्ट
कचेरया. सचिन चा इगो दूखावतो .दोघींचा सांभाळ करायला तयार असणारा कोर्टात तिच्यावर खोटे आरोप करायला लागतो.स्वत: लफड करून चूकलेला तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतो .
बरेच दिवस याला तोंड देणारी ,प्रीया याला कंटाळते व म्हणते की माझ जाऊदे पण लेकराला बापाच प्रेम मिळायला पाहीजे.मुलाच तरी त्यान कराव येवढी माफक अपेक्षा.
आता प्रीया न त्याला माफ केलय नव्हे तीला आत्ताश्या त्याची दया येतेय व वाटतय तीन त्याला तोडायला नको होत.
तिचा संघर्ष चालू आहे तिच्या भावनांशी व तीची तीची ती उडते ही आहे स्वतंत्र आकाशात मूक्त तीच्या कले सोबत ,तिच्या नव्या वाटांवर नव्या ध्येया साठी.
अश्याया प्रेमाने पोळलेल्या प्रेमाच्या साईड इफेक्ट बद्दल पूढच्या पिढीला सावध करू बघताहेत .

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा