पोस्ट्स

एप्रिल, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्नांचा पाठलाग

इमेज
    प्रवास खुप काही देत असतो मग तो जीवनात येणारा छोटा,मोठा प्रवास वा संपूर्ण आयुष्याचा प्रवास असो.असतात चढउतार , अडचणी पण त्या शिकवून जातात बरच काही किंवा नव्याने आपलीच आपल्याशी ओळख करून देतात.     त्या दिवशी रिजर्वेशन मिळाल नाही म्हणून लेडीज डब्यात बसले,प्रवास चाळीसगांव ते अमरावती.प्रचंड गर्दी,त्यात लेडीज डबा लहानआणि इतर कुठे चान्स मिळाला नाही म्हणून काही पुरूषही त्यात चढले . दारातल्या बायकांनी ढकलल्या मुळेच आम्ही आत आलो खरतर.रिजर्वेशन न मिळाल्याने पण जाण गरजेच असल्या मुळे सगळ्या स्तरातल्या व पदावरच्या लेडीज भारताच्या विविधतेच दर्शन घडवत प्रवास करत होत्या त्या डब्यात.           अंगणवाडी सेविका पुण्यात मानधन वाढवण्या साठीच्या मोर्चात सामिल होवून परत निघाल्या होत्या , बांधकामावर मजूर म्हणून काम करणारया, शिक्षीका,माझ्या सारख्या गृहीणी,TLC मध्ये काम करणारी इंजीनियर , खुप नटलेल्या पण बुरखाधारी मुस्लीम स्रिया ते OxFerd ला Phd साठी चाललेली एक आई.        आपण आज या आई बद्दल बोलुया. ऐवढ्या गर्दीत तिन खाली बसून पुस्तक वाचायला घ...