स्वप्नांचा पाठलाग

    प्रवास खुप काही देत असतो मग तो जीवनात येणारा छोटा,मोठा प्रवास वा संपूर्ण आयुष्याचा प्रवास असो.असतात चढउतार , अडचणी पण त्या शिकवून जातात बरच काही किंवा नव्याने आपलीच आपल्याशी ओळख करून देतात.
    त्या दिवशी रिजर्वेशन मिळाल नाही म्हणून लेडीज डब्यात बसले,प्रवास चाळीसगांव ते अमरावती.प्रचंड गर्दी,त्यात लेडीज डबा लहानआणि इतर कुठे चान्स मिळाला नाही म्हणून काही पुरूषही त्यात चढले . दारातल्या बायकांनी ढकलल्या मुळेच आम्ही आत आलो खरतर.रिजर्वेशन न मिळाल्याने पण जाण गरजेच असल्या मुळे सगळ्या स्तरातल्या व पदावरच्या लेडीज भारताच्या विविधतेच दर्शन घडवत प्रवास करत होत्या त्या डब्यात.
          अंगणवाडी सेविका पुण्यात मानधन वाढवण्या साठीच्या मोर्चात सामिल होवून परत निघाल्या होत्या , बांधकामावर मजूर म्हणून काम करणारया, शिक्षीका,माझ्या सारख्या गृहीणी,TLC मध्ये काम करणारी इंजीनियर , खुप नटलेल्या पण बुरखाधारी मुस्लीम स्रिया ते OxFerd ला Phd साठी चाललेली एक आई.
       आपण आज या आई बद्दल बोलुया.
ऐवढ्या गर्दीत तिन खाली बसून पुस्तक वाचायला घेतल यातच तिच्यात काही तरी वेगळ आहे हे जाणवल . अंदाज केला परिक्षा असेल म्हणून ती एवढ सिरीयसली वाचत असावि ,पण ते अभ्यासातल पुस्तक वाटत नव्हत मग न राहवून विचारलच "काय वाचतेस?" "गितांजली!" या उत्तराने माझी तिच्या शि संवादाची लालसा वाढली.
     मग तिला माझ्या जवळ बसायची आँफर दिली. तुम्ही काय करता ?कुठे चाललात?अशी प्रश्नाेत्तरे सुरू झाली.पुढे एका स्टेशनर एक अगदी छोट बाळ असलेली बाई डब्यात शिरली ,सोबत तिची आई ही होती ,तिलाही वर बसायच विचारल पण ती ओली बाळांतीण म्हणजे काही दिवसा पूर्विच तिची डिलीवरी झाली असावी म्हणून ती चढता येणार नाही म्हटली मग तिच्या बाळाला घेतल पण ते माझ्या जवळ रडायला लागल तस आपल्या पुस्तक वेड्या मैत्रीणीने त्याला घेतल आणि ते शांत झाल व ती त्याला छान खेळवायला लागली.
     मग ती सांगायला लागली कि तीची ही सहा महीन्यांची जुळी मुल आहेत ,ती तिच्या आई कडे असतात ,त्यांना वेळ देता येत नाही म्हणून चान्स मिळाला की इतर मुलां सोबत वेळ घालवून ते सुख मिळवायच.
        तिच्या या उत्तराने मी अधिकच अवाक झाले.कारण तीच्या कडे बघून ती काॅलेजला जाणारी मुलगी वाटत होती म्हणजे संतूर माॅम वगैरे नाही पण She is not a marriage material type girl अस काहीस.
      तर ती सायकोलाॅजी स्टुडंट होती ,टाटा इन्सटीट्युट मध्ये सायकोलाॅजीस्ट म्हणून काम करत होती आणि आत्ता मॅम "Oxferd" ला चालल्या होत्या Phd साठी.
      माझ्या सारख्या घरएक घर एवढच जग असणारया स्री साठी लग्ना नंतर अस काही करता येत तेही छोटी मुल आपल्या पासून लांब ठेवून कारण मी माझी स्वप्न कधीची गुडांळू ठेवलीत कुठेतरी.
      या सगळ्यात नवरा आणि सासरच्या माणसांची तिला खुप साथ मिळाली म्हणजे तिचा नवरा CRPF मधे ,सासूसासरे गावाकडे ,मुल आईवडिलां कडे आणि ही मुबंईत ,आत्ता लंडन ला.
       कुठले सणवार करायला ये,घरातले कार्य करायला ये म्हणजे आपली टिपीकल सुनेची कर्तव्ये अस काहीच नाही त्यात म्हणे ती आणि नवरा मोजून तीस दिवस सोबत रहीले असू ,ऐकाव ते नवलच अस झाल मला ,अशी माणस म्हणजे नवरा बायको कडून कुठलीही अपेक्षा न ठेवणारा आणि तीला तिच्या निर्णयात साथ देणारा म्हणजे अडकाठी न करता अजून काय हवय?
     असो असे बदल कमी दिसतात पण हेही नसे थोडके.
आज तिची फ्लाईट आहे ,तिला काही तास तिच्या नलरया सोबत घालवायचेयत म्हणून आजच  वाचन करून घेतेय अस म्हणून तिने परत पुस्तकात डोक घातल .
      एका स्रीचा तिच्या स्वप्ना साठी चा हा पाठलाग मला सुखावून गेला .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)