लक्ष्मी बाई

एकटीन जीनं ,मस्तमौला जीव घरोघरी राबून त्वा कमवली भाकर शरिरान काटक, अन मनान खंबीर उंचपूरा बांधातुहा ,रंग गोरापान नाव तुय लक्ष्मी ,देते लोकाईले धन आपला हात जगनन्नाथ नको लाचारीच जीन नाही रगताची नाती, ना उरला धनी कुकवाचा उफराट्या न्यायाले भाग्याच्या तुन देल्ला नाही दोष येणारया दिसाचे हासुन तुन केल बाई स्वागत व्हयाच ते व्हईन कुठ गाया आसवले लेका आहे दम माया मंद्दी नको फुकाची भाकर स्वाभीमानाच हे जीन जगते म्हणे मी बापहो