हिरकणि मी


लेकरू  कडेवर धरते
ओझे संसाराचे वाहते
जीवनरूपि कड्यावर
हि हिरकणि चमचमते
आसवे लेकराची 
ति माय पदराने पुसते
त्याच्या हास्या साठी
ति क्षण क्षण हो झिजते
जीवनरूपि कड्यावर
हि हिरकणि चमचमते
नाति जपता जपता
अनेक घाव सोसते
जीवनरूपि कड्यावर
हि हिरकणि चमचमते
ठिकरया ठिकरया होते
रक्तांळते ,घायाळ होते
जीवनरूपि कड्यावर 
हि हिरकणि चमचमते
डोळ्यात आसू अन
गालावर हसू घेऊन
नव्या दिसाच्या 
आशेवर  जीवनकडा 
हा उतरते
हि हिरकणि चमचमते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)