फरपट
सविता सकाळीच घराबाहेर पडली. जराशी डिस्टर्बच दिसत होती.घरातल्याच साडीत ,हातात पर्स घेऊन ती रिक्षास्टँड वर आली.पुढे कुठे जायच अस काही तिने ठरवल नव्हतच म्हणून तर रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याच्या आवाजाने ती भानावर आली व स्टेशनवर जायच अस सांगताच रिक्षा त्या दिशेने निघाली. सगळा वृतांत तिच्या समोर आला. सविता लग्न होऊन पाटलांच्या घरची सुन होऊन आली होती ,नव्याचे नऊ दिवस लवकरच संपले आणि तिला घरातल्यांची हळूहळू ओळख होऊ लागली. तसे सगळे पाहूणे गेल्यावर घरात उरली फक्त चार डोकी. सासू सासरे आणि हे दोघ.सासरे निवृत शिक्षक तरी ते कश्यात तरी व्यग्र असायचे व सासूबाईचे आपले दिवसभर घरातली काम व देवपूजा. या अश्या सालस माणसांचा मुलगा संजू पण भरकटलेला ,व्यसनाच्या आहारी गेलेला. घरातला शेवटचा पाहूणा गेला आणि संजू बाहेर गेला ते रात्री बारा नंतर वेगळ्याच अवतारात परतला. त्याच्या आवाजान दार उघडायला गेली तर दार उघडताच तो तिच्या अंगावर पडला ,सावरल तिन स्वत:ला आणि त्याला ही. ...