पार्टटाईम नवरा
उषा आज येणार नाही.असा निरोप रामदासीनीं दिला.
इकडे,सुरभीला आँफिसला जायची घाई अन त्यात उषा येणार नाही चा निरोप म्हणजे दूष्काळात तेरावा महिना म्हणजे वेळेच्या बाबतीत.
सुरभी थोडी वैतागलीच पण तिला आता उषाची काळजीही वाटू लागली.
आपण जेवणाच्या सुटीत उषाला फोन करायचा अस स्वत:शिच ठरवत घरातली महत्वाची काम आटपून ती आँफिसात निघाली.
ठरल्या प्रमाणे सुरभीने उषाला फोन लावला ,फोन किर्ती ने उषाच्या धाकट्या लेकीने उचलला.
"आई कुठे आहे? का आली नाही कामावर ?" सुरभी च्या प्रश्नाला किर्ती न "घरी पाहुणे आलेत, दिदीला बघायला." अस उत्तर दिल.
आता उषाशी बोलता येणार नाही अस स्वत:शिच ठरवून सुरभीन फोन ठेवला.
आँफीस नंतर घरातली उषाचीही काम आटपत सुरभीचा दिवस संपला ,पुन्हा पंलगावर पडताच तिला उषाची आठवण झाली त्यातच थकलेल्या शरिरान मनही नकळत झोपेच्या स्वाधीन झाल.
रोजच्या वेळेवर सुरभीचा दिनक्रम चालू झालाच होता की दारावरची बेल वाजली.
तोंडातला ब्रश तसाच ठेउन तीन दार उघडल तर उषा साडीचा पदर खोचत किचन मधे भांडी घासायला लागली.
एकंदरीत काम आटपण्याचा सपाटा लावला उषान.
न राहवून सुरभीनेच चहा टाकत तीला विचारल ,"उषा दिपाली लहान आहेग अजून ,आत्ताच का तिच्या लग्नाची घाई करतेयस.तस तर अठरा वर्षा खालील मुलीच लग्न कायद्यान गुन्हा आहे."
तस उषान सुसकारा घेत उत्तर दिल ,"बाई सगळ ठाऊक आहे जी,पण बापा शिवाय तीन पोरींची जबाबरारी कित्ती दिवस मी एकलीन पार पाडायची,त्यात मी कामावर आली की पोरीं कुनाच्या भरवष्यावर ठेवायच्या खोलीत.आमच्या पुरयात दुपारची कामावर जाणारी बाया माणस सारी.त्यात या पोरीच शाळेत लक्ष लागत नाही मग हिला कुठ ठेवायची दुपारची."
"कामाला आणत जा सोबत",अस सुरभी ने सूचवून पाहील तर उषा म्हणाली ,"इकडे कुठल्या तरी पोरा सोबत फिरतांना पाहीलय तिच्या बापान तीला,म्हणून तर नात्यातलीच सोयरीक करायचा घाट घातलाय, मी बी म्हटल तो सवताच जबाबदारी घेतोय तर कशाला खोडा घाला."
मग सुरभी जरा बुचकळ्यात पडली की उषाचा नवरा तर तीला सोडून गेलाय मग हे काय?
तस सुरभीन उषा ला विचारल ,"अग पण तुझा नवरा तर तुमच्या सोबत राहत नाही ना ,मग?"
तस उषा नी काम थांबवल व सांगायला लागली,"अव ताई तो नाही राहात आमच्या सोबत पण लेकरां साठी येतो तव्हा मी बी त्याला अडवत नाही.
तो बांधकामावर मिस्तरी काम करायचा तिथच त्याला ती भेटली म्हणजे माझी सवत ,लई दिस लोक काही बाही येवून सांगत मले पण मी काही कंधी त्याच्याशी भांडली नाही त्याच्यावरून , एक दिवस त्यानच हून मले सांगतल की मी शोभाशी लगीन करनार हाय अन तीच्या संगटच राहीन पन माहया लेकराईच करत जाईन"
"मी त्याले परत काहीच इचारल नाही की कशा साठी अडीवल नाही.माहेरची मानस मांग लागली, सोडचिट्टी दे ,पोटगी माग पन म्याच ठरीवल या वयात मले काय करायच हाय,माया लेकराच्या डोक्यावर बापाच छत्र रायल बस ."
माया नवरयान कधी मारझोड केली नाही की गाया दिल्या नाही.हा आत्ता त्याचा जीव लागलाय तीच्यावर जावू द्या."
अन उषा लागली परत कामाला .तीच्या समजूतीच सुरभीला कौतूक वाटू लागल सोबतच तिची अँडजस्टमेंट तिला सुरभीच्या नजरेत वर घेउन गेली.
नवरया वर सतत संशय घेउन भांडणारया , थोड्या थोड्या गोष्टी साठी डिवोर्स घेणारया बायकांच्या अन उषाच्या शिक्षणा शिवायच्या संमजस पणात जमीन आसमानचा फरक होता.
तिच प्रेम निस्वार्थ अन सर्वार्थाने स्विकार करणार होत.
असा उषान पार्टटाईम जाॅब सारखा पार्टटाईम नवरा स्विकारला होता.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा