फरपट
सविता सकाळीच घराबाहेर पडली. जराशी डिस्टर्बच दिसत होती.घरातल्याच साडीत ,हातात पर्स घेऊन ती रिक्षास्टँड वर आली.पुढे कुठे जायच अस काही तिने ठरवल नव्हतच म्हणून तर रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याच्या आवाजाने ती भानावर आली व स्टेशनवर जायच अस सांगताच रिक्षा त्या दिशेने निघाली.
सगळा वृतांत तिच्या समोर आला.
सविता लग्न होऊन पाटलांच्या घरची सुन होऊन आली होती ,नव्याचे नऊ दिवस लवकरच संपले आणि तिला घरातल्यांची हळूहळू ओळख होऊ लागली.
तसे सगळे पाहूणे गेल्यावर घरात उरली फक्त चार डोकी.
सासू सासरे आणि हे दोघ.सासरे निवृत शिक्षक तरी ते कश्यात तरी व्यग्र असायचे व सासूबाईचे आपले दिवसभर घरातली काम व देवपूजा.
या अश्या सालस माणसांचा मुलगा संजू पण भरकटलेला
,व्यसनाच्या आहारी गेलेला.
घरातला शेवटचा पाहूणा गेला आणि संजू बाहेर गेला ते रात्री बारा नंतर वेगळ्याच अवतारात परतला.
त्याच्या आवाजान दार उघडायला गेली तर दार उघडताच तो तिच्या अंगावर पडला ,सावरल तिन स्वत:ला आणि त्याला ही.
अंगात दारू भिनलेल्या संजून सविताला दार उघडायला उशिर का झाला म्हणून विचारत शिव्या दयायला सुरूवात केली , सविताला हे नविनच होत ,काय चाललय तीला कळेचना.
बाहेरचा आवाज ऐकून सासू बाई बाहेर आल्या आणि संजू ला शांत करायचा प्रयत्न करू लागल्या तर त्यान आईलाच ढकलून दिल व स्वत: पलंगावर आडवा झाला.
सविता पूढे आली सासू ला सावरायला , सासू बाईनां अवघडल्या सारख झाल तो सविताचा नवरा असला तरी ,त्यांचा मुलगा आहे आणि नविन सूने समोर याच अस.
त्यांनी तिला,आपण ठिक असल्याच सांगत ,त्याची बाजू सांगायचा प्रयत्न केला,"अग गेला असेल मित्रां सोबत , तू त्याच टेन्शन नको घेऊस."
सासू गेल्या वर सविता ऐकटक आपल्या नवरया कडे बघत होती , हा देह आपला नवरा आहे अन त्याची ही अवस्था ----असा विचार करत तिचा डोळा लागला.
सकाळी ति आपली सासू च्या सुचने वरून घरातली काम ऊरकत होती कि थोड्या वेळात संजू आईला हाका मारू लागला. तष्या त्या ,"अरे आत्ता तू तुझ्या बायको ला सांगत जा ,काय हव नको ते.तुझ हक्काच माणूस आलय की आत्ता ."
त्या रात्रीचा प्रसंग विसरून वातावरण हलक व्हाव म्हणून हे करत होत्या ,सवितान ही फार काही रियाक्ट केल नाही.
त्या सविताला काही सुचना देत संजूच्या खोलीत शिरल्या.
"अरे आत्ता तुझ लग्न झालय ,आत्तातरी ते पिण सोड रे .ति पोरगी किती घाबरली होती रात्रीच्या तुझ्या अवताराला."
अस सांगतच होत्या की सविता चहा घेऊन आली. तश्या सासूबाई बाहेर आल्या खोलीतन त्या दोघानां जरा एकांत मिळावा म्हणून.
संजून चहा चा कप हातात घेतला अन खाल मानेनेच तिला ,"साँरी बर का ,मला काहीच आठवत नाही अग पण आईने मला सांगीतल रात्रीच्या माझ्या वागण्या बद्दल. साँरी ह.मला माफ कर ."
हा संवाद इथेच संपला.
संजू फर्टीलायझर दुकान चालवायचा ,चालवायचा म्हणजे काही तास तो दुकानावर बसायचा , ते तो काही तरी करतोय अस त्याला आणि घरच्यानां ही वाटाव म्हणून .
वडिलांनी भांडवल देऊन ते सूरू करवल होत. संजू ग्रॅजूएट होता पण अनेक वर्ष मनासारखी नोकरी मिळाली नाही आणि रिकाम्या वेळात टूकार ,रिकामटेकड्या मित्रांनी त्याची वाट लावली.
दूपारचाच संजू दुकानातन गायप असायचा. हातात पैसा असल्या मुळे दोन चार टाळकी सोबत घेऊन त्यांच्या सोबत ठरलेल्या अड्यावर खाण्या पिण्या सोबत जूगार सुरू व्हायचा ते थेट बाटलीतली दारू आणि खिशातले पैसे संपे पर्यंत.
अश्याच अनेक रात्री नवरया च्या निर्जीव देहाकडे बघण्यात गेल्या . तस सविताने एक दिवस स्वत:शिच ठरवल की आत्ता बास ,आत्ता त्याच्याशि बोलायच अगदी सासू सासरयां समोर.
सकाळी संजू तयार होऊन निघायच्या तयारीत असतांनाच तिन त्याला उद्देशून," मला जरा बोलायचय तुमच्या शी,"
संजू," काय आहे? आत्ता उशीर होतोय ,नतंर बोलू"
"पैसे हवेत?आई इला दे किती हवेत ते.की माहेरी जायचय ,जावून ये."
तस सविता म्हटली," यातल काहीच नाही ,पण बोलायचय."
"आई बाबा ,मला माफ करा पण मला दूसर काही सुचत नाहीय. हे रोजच पिऊन येतात .आमच्यात सकाळच्या चहा ,नाश्त्या शिवाय काहीच संबध येत नाही."
"यांच्या मर्जीशिवाय आमच लग्न झालय का?"
तसा संजू तडक काही न बोलताच बाहेर गेला.
सासू सासरयानां काय बोलाव सुचतच नव्हत.सगळे शांत.
ज्याने उत्तर दयायचे तो तर निघून गेला होता.
तसा दूपारी निरोप आला कि संजू एकाला रस्त्यावर बेशूध्द अवस्थेत दिसलाय.
सासरेच गेले त्याला बघायला ,त्याला अँडमिट केल दवाखान्यात.
सविताला कुणिच काही बोलल नाही पण तिची कुणी फारशी दखलही घेतली नाही.
संजूची किडनी डॅमेज झाली होती ,हा धक्का सासरयानां पँरलाईज करून गेला आणि नवरयाचि ,मुलाची अशी अवस्था सासूबाईंनां अधिकच शांत करून गेली.
सगळा भार सविता वर ऐवून पडला , लग्नामुळे मिळालेल बायको पण (नवरयाच नावा शिवाय काहीही नसल तरी) ,तिची जबाबदारी तिला पार पाडायची होती.
घरात सासरे खाटीला खिळलेले ,त्यांच अस्तीत्व आता तेवढच .
नवरयाची अवस्था बिकटच ,पुढे त्याला मोठ्या दवाखान्यात, मोठ्या शहरात न्याव लागणार होत.
या साठी लागणारा पैसा कसा ऊभा करायचा? तर साधन एकच दुकान .ज्याच फार काही तिला माहीत नव्हत .
पण आत्ता ते तिला माहीत करून घ्यावच लागणार होत.
सविता नव्या जबाबदारी सोबतच नव्या निश्चया निशी दुकानावर गेली तर---
सगळ्या हिशोबात तिला बराच गोधंळ दिसला ,त्यात बरीच उधारी अन कर्ज ही.
काही दिवसां पूर्वी नवी नवरी नवी स्वप्ने घेऊन या घरात ,कुटूंबात आली होती तीची आता नव्या आघाड्यावंर कॆसौटी होती.
त्यातच सकाळी संजूची तब्बेत सिरीयस असल्याचा फोन आला व त्याला लगेच मुबंई ला हलवावे लागणार असा निरोप ही.
सगळी जुळवा जुळव करतांना सविताची फरपट सुरू झाली एका अंधारलेल्या मार्गावर कुणास ठाऊक आशेचा प्रकाश तीच्या साठी कुठे असेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा