मॅडम

शिक्षक त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळेतला म्हणजे सगळा सावळा गोंधळ असच काहीस आपल्या सामान्यांच मत असत. त्यात बिचारयानां मध्यांन भोजन ,खिचडी वाटप कधि जनगणना अशी जास्तीची काम दिली जातात मग विद्यार्थ्याच्या मुळ विकासा कडे ते शिक्षक कसे लक्ष देतिल . पण याला काही अपवाद असतात जे मुलांना शिकवण्या पलीकडे त्यांच्या इतर गरजा कश्या पुर्ण होतिल या कडे ही लक्ष देतात व वेळोवेळी त्या पूर्ण ही करतात. तशीच एक शिक्षीका म्हणजे मुन्ना देशमुख मॅडम . जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुल म्हणजे साधारण घरातली मुल जिथे प्राथमिक गरजाच मोठ्या कष्टाने पूर्ण होतात त्यात या मॅडम शिकवत असलेल्या शाळेतली मुल ऊसतोड कामगांराची .ज्यानां शाळेत वर्षभर हजर असणच मुश्किल पण मुन्ना मॅडम सारखी शिक्षीका जी मुलांच्या घरी जाऊन ,त्यांच्या पालकानां समजाऊन ,त्यानां जीवलाऊन शाळेत यायला प्रेरित करते ,एवढच नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करते. त्यां मुलाच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढते/दाखवते. त्यांच्या शैक्षणिक प्रगति बरोबर त्यांच्या सर्वांगिण विकासा कडेही लक्ष देते .मुलांन मधले स...