मॅडम

  
शिक्षक त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळेतला म्हणजे सगळा सावळा गोंधळ असच काहीस आपल्या सामान्यांच मत असत. त्यात बिचारयानां मध्यांन भोजन ,खिचडी वाटप कधि जनगणना अशी जास्तीची काम दिली जातात मग विद्यार्थ्याच्या मुळ विकासा कडे ते शिक्षक कसे लक्ष देतिल .
पण याला काही अपवाद असतात जे मुलांना शिकवण्या पलीकडे त्यांच्या इतर गरजा कश्या पुर्ण होतिल या कडे ही लक्ष देतात व वेळोवेळी त्या पूर्ण ही करतात.
तशीच एक शिक्षीका म्हणजे मुन्ना देशमुख मॅडम .
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुल म्हणजे साधारण घरातली मुल जिथे प्राथमिक गरजाच मोठ्या कष्टाने पूर्ण होतात त्यात या मॅडम शिकवत असलेल्या शाळेतली मुल ऊसतोड कामगांराची .ज्यानां शाळेत वर्षभर हजर असणच मुश्किल पण मुन्ना मॅडम सारखी शिक्षीका जी  मुलांच्या  घरी जाऊन ,त्यांच्या पालकानां समजाऊन ,त्यानां जीवलाऊन शाळेत यायला प्रेरित करते ,एवढच नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करते.
त्यां  मुलाच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढते/दाखवते.
त्यांच्या शैक्षणिक प्रगति बरोबर त्यांच्या सर्वांगिण विकासा कडेही लक्ष देते .मुलांन मधले सुप्त गुण ओळखुन त्यांना मार्गदर्शन करता व त्या दृष्टीने  मदतही करतात.
आत्ता लाॅकडाऊनमुळे त्यांच्या शाऴेतील मुल ज्या दुर्गम वस्त्यां मधून येतात त्या दुर्गम वस्त्यां पर्यंत ही या मॅडम मदत घेऊन पोहचल्याच. भूकेल्या गरजू लोकां बद्दल कळकळ त्यांना निर्मनुष्य ,दुर्गम ,ओसाड ,माळराणा पर्यंत घेवून गेली.
आजकाल असे शिक्षक मिळणे दुरापस्तच.
म्हणूनच या मॅङम मधल्या ऐका शिक्षीके बरोबर तीच्यातला माणूसकिला सलाम 🙏
जिथे जाणिवा बोथट झाल्या 
माणूस स्वार्थाने बरबटलेला
पेशा शी ची ही ना राखली लाज
तिथे तुझ्यातल्या समर्पणाला सलाम
सलाम तुझ्या माणूसकीला 
सलाम तुझ्यातल्या मातृह्रदई स्री ला 
सलाम🙏सलाम🙏

 

टिप्पण्या

  1. खरच मॅडम आम्ही शाळेत असताना पण तूम्ही आईच्या मायेने वाढवलं आणी
    गुरू द्रोणाचार्य सारखं शिकवलं
    ताई सलाम तुमच्या कार्याला.
    जि. प. प्रा. शाळा जामडी ज.
    ता कन्नड जि. औरंगाबाद

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच सुंदर,अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कार्य.
    आम्हाला खूप अभिमान आहे कि आम्ही आपल्या सानिध्यात काम करतोय. आपल्या अश्या सामाजिक कार्यामुळे आम्हाला सदैव प्रेरणा मिळत राहते.
    मि आपले कार्य खूप जवळून पाहिलं आहे. आपण अनेक गरजू होतकरू विद्यार्थ्यांना चप्पल देऊन त्यांच्या पायाच्या चटके वाचवले आहेत. तसेच कपडे भेट देऊन त्यांना आनंददायी अनुभव करून दिला आहे.

    आपले कार्य शब्दात सांगायचे झाले तर "जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी"
    आपल्या हातून असंच सदैव समाज कार्य घडत राहो.
    आणि आम्हाला आपल्याकडून प्रेरणा मिळत राहो या सदिच्छा व शुभेच्छा

    निलेशकुमार.टी.शिंदे
    जि.प.उच्च प्राथमीक शाळा शिंदि तालुका-चाळीसगाव, जिल्हा- जळगाव

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)