स्वाभीमान आणि भूक
करोनाच्या कहराच्या गोष्टीं नी सार जग व्यापलय पण त्यासोबत आलेल्या लाॅकडाऊन मुळे अनेक प्रभावीत झालेत.कामधंद्ये बंद ,जिथे मोठ्यांना याची झळ बसलीय तिथे रोजच कमवून खाणारयांच विचारायलाच नको.
काहीनां सरकारी मदत मिळाली तर काहीनां समाजभान अललेल्या संस्था वा दानशूर लोकांनी कुठे महिन्याच राशन दिल तर कुठे दोन वेळच जेवण पुरवल.यातही बरीच मंडळी या कुठल्याच मदती विना वंचीत ठरली .
एक तर त्यांच्या पर्यंत कुणिच पोहचल नाही किंवा कुठे काही मिळत त्याची माहीतीच नाही.
मागायला जायच तरी कुठे ?
अशीच एक दोन लेकरांची आई आज आली .लेकरांना खायला काही तरी दे, म्हणून गळ घालायला लागली.
ती जवळच राहणारी कोमटी (जे जुने कपडे घेऊन भांडी देतात)स्त्री होती . ती नेहमीच दारावरून जायची ,तशी तीची आणि माझी ओळख पाच,सहा वर्षा पुर्विची . अंगान बारीक कुपोशित वर्गात मोडणारी ,पहिल्या वेळी गरोदर होती तेव्हा ही सासू लांबून पाणी आणायला पाठवायची,मोठ्ठे हंड्डे डोक्यावर , पुढे आलेल पोट आणि बारीक झालेले हातपाय.खुप दया यायची तिची आणि तिच्या सासूचा रागही यायचा .ऐरवी दिवस गेलेत म्हणून कित्ती लाड असतात बायकांचे त्यात पहीलटकरिण म्हणून डोहाळे पुरवले जातात.बाळासाठी का होईना तिची खुप काळजी घेतली जाते.पण इच्या नशिबी तस काहीच नव्हत.
कधि फारच जीवावर आल तर बोअरच पाणी घेवून जायची माझ्या कडून तर कधि शेजारयांन कडून.
मी निवांत दिसली तर एक कप चहा पाज म्हणायची. वर विनंती करायची माझी सासू आली तर सांगू नको ,म्हणायची.
पुढे बाळांतपणा नंतर एवढस लेकरू पाठीवर बांधून , डोक्यावर भांड्याच टोपल घेवून ती आपल कपड्यांवर भांडी द्यायच काम करायला जायची.
कधी कधी त्या बाळा साठी भीती वाटायची कारण ती ते रडायला लागल की चालतच त्याला छातीशी धरून दूध पाजायची.हि ही हिरकणिच.
हे मोठ्ठ होत नाही तोवर परत दुसर पोटात . मी एकदा बोललीही आत्ता आँपरेशन कर . पण ते करण तीच्या हातात कुठे होत. शरिर, गर्भाशय तीच जरी असल तरी त्याची मालकी इतर कुणाची तरी होती.
बरयाचदा वाटत कि यांच्या मुलांसाठी पण पाळणा घर असावीत, त्यांच्या घरच्यांनाही कुटुंब नियोजनाच महत्व सांगणारी यंत्रणा असावी पण---------
आत्ता ती दोन लेकरांची आई आहे ,धंदा बंद घरात येणारी आवक बंद मग मुलां साठी ती आज बाहेर पडली कारण घरात शिजवून वाढायला काहीच शिल्लक नव्हत.
कुणी तरी पिठ दिल सांगत होती, तु तांदूळ ,दाळ ,मीठ ,मिर्ची दे म्हणाली.
खरतर या परिस्थीतीत मी काहीच करत नाहीय याची खंत तिच्या रूपाने काही अंशी मिटणार होती म्हणून मी आपल पेपर मध्ये वाचल्या प्रमाणे थोडे गहू ,तांदूळ ,तुरीची डाळ ,साखर अस बांधून दिल .
तर तीन काही पैसे मागीतले ,लेकरांना भिस्कीट देते म्हणून ,यात लेकरांच्या भिस्कीटा बरोबर तिची तंम्बाखूची सोय होणार होती.
एकदोन वेळा हटकल होत पण हे इतक सोप्प नसत लोकांच्यात बदल घडवण्या साठी वारंवार त्याच्यां पर्यतं पोहचाव लागत हे येव्हाना माझ्या लक्षात आलय.
मग दिले तिला पन्नास रूपये.
पैसे घेतानां मला आश्वासन देवून गेली कि हे सगळ संपल्यावर मी तुला काही भांड देवून जाईन.
आहे की नाही स्वाभीमानी हिरकणी ?
जिथे करोडों कमावणारे दुसरयाला कस लुबाडता येईल अस बघतात तिथे या स्वाभीमानी आईला सलाम ठोकावासा वाटतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा