आम्ही शाळा बाह्यच ,शाळा येईल का आमच्या पर्यंत?

रस्त्याच्या बाजुला परराज्यातुन आलेली चार/पाच बिरहाड्,छोट्या टेंम्पोमध्ये सगळ सामान ,अगदी चुली पासून तर खाटी पर्यंत,विकायच्या वस्तु ,मुलबाळ सगळच गाडीत."संसार आँन व्हील्स्" सकाळी बाहेर चुल मांडून चहा ,स्वयंपाक करायचा व दिवस उगवला तसा व्यवसाय सुरू. काही दुकानांन वर फक्त मुलच ते सांभाळत होती.त्या बहुतेक मुलीच होत्या .लहान भावंड सांभाळन ,घरातली छोटी मोठी काम करन, आपल्या कडच्या सामान्य घरातिल मुली जे करतात तेच अनेक मुलींनच्या वाट्याला येत .मग कसली शाळा अन कसल शिक्षण . जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत तिथे शिक्षण लांबच. आपल्या भागात शाळाबाह्य मुलांच सर्वेक्षण सुरू आहे.सरसकट सगळ्याच घरात मुल शाळेत जातात का ? अस एखाद मुल आहे का जे शाळेत जातच नाही ? या प्रश्ना वर आश्चर्यच वाटल कारण सुखवस्तु घरातिल सगळीच मुलं जनरली शाळेत जातातच ,यांच्या शिक्षणाच्या बाबतित पालक जरा जास्तच जागरूक असतात ,मग हे सर्वेक्षण सगळी कडे कशा साठी? वाड्या ,वस्त्या ,कष्टकरी ,कामकरी लोकांच्यात मुल शाळेत घा...