लेकी जबाबदार ज्यांना जावयाची ही साथ

   परवाच्या ऐका पुरवणित अशा लेकीं बद्दल वाचल ज्या आई वडिलांची लग्ना नंतरही  जबाबदारी घेतात आणि त्यात त्यांच्या नवरयाची ही साथ मिळते ,सोबत अनेकींच्या बाबतीत अस करायला सासरच्या लोकांची परवानगी नसते ,काहींना तर माहीरी जायला ही बंधन असतात ,कमावत्या स्रियानां ही आपल्या पगारातुन आईवडिलांना काही आर्थीक   मदत  ही करता येत नाही.

   अस सगळ वाचल मग वाटल हा विषय आत्ता पुरवणित यायला कारण काय ? हा तर सामान्य पणे समाज मान्य आणि माहीत असलेली गोष्ट नाही का? ज्या  मुळे तर मुलगा च हवा  या अट्टाहासात मुली नकोश्या होत त्यांना गर्भातच मारण्याचा धडाका लागला लागला , परत मुलींची संख्य कमी झाली म्हणून मग "बेटी बचाव ,बेटी पढाव"  चा नारा , गर्भ लिंग चाचणीवर बंदी , तस करणारया डाॅक्टर व करून घेणारया पालकांना शिक्षेची तरतूद.

      पण या सगळ्याच्या मुळाशी असलेली मानसीकता बदलायला काय करायच ?????

  अश्याच ऐका समस्येवर तोडगा म्हणून परत कायदा आला.मुलांनी अनाथ केलेल्या वृध्दांची जबाबदारी व त्या योगे बदललेली आपत्य शब्दाची व्याप्ती



   म्हणून कदाचित  पुरवणीत त्या लेकींची माहीती होती.

पण आपण खरच कुठे चाललो आहोत नाही का? 

नाती जपायला ,आपल्या माणसांची जबाबदरी घ्यायला ही आत्ता कायदयाने  तस बंधन आणाव लागतय .

   आत्ता ची पिढी बेजाबदार , त्यांना बंधन नकोत ,जबाबदारया नकोत अस म्हटल जातय.पण वृध्दांश्रम सुरू होऊन ही बरीच वर्ष झालीत नाही का ?

    सुनानां सासुसासरे नको असतात , बायकोच्या नादी लागून मुल आई वडिलांना परके होतात अस सारख ऐकवल जात ,बोलल जात पण ज्यांना मुलीच आहेत त्यां मुलींनी  आई वडिलांची जबाबदारी घ्यावी किंवा जावयाने सासू-सासरयांचा  मुला प्रमाणे साभांळ करावा अस कधिच म्हटल जात नाही.

      मुलगा मुलगी भेद नको ,तसा तो काही प्रमाणात ,काही बाबतीत ,काही घरां मध्ये केला ही जात नाही पण ------

     हा "पण " खुप काही सांगुन जातो.आपल्या देशात परंपरा निभावण्याच सार गाठोड मुलीं ,बायका ,एकंदरीत स्रीयांच्याच डोक्या वर ,खाद्यावर ठेवल गेलय आणि आजही त्या ,त्या ओझ्या खालीच दबलेल्या दिसून येतात.मग त्या स्रीची माहेरची माणस ही हा भार मुलगी झाल्या पासून उचलत राहतात यातच तर मुलगी होण म्हणजे कमी पणा घेण , सतत एका दबावात राहण हे आलच ,परक्याच धन म्हणून वाढवलेली पण काळजाचा तुकडा असलेली लेक दुसरयाच्या स्वाधिन करण वर मुलगी दान देऊन त्या दान घेणारयांचेच पाय धुण ---

    अस इतर दान देतानां होत का हो? खरतर दान देणारा मोठा पण या बाबतीत नाही ,राबणार हाडा मासाच माणूच  निरनिराळ्या  चिजवस्तू ची भर घालून नवरदेवाला द्यायची  ,वस्तू पेक्षा तिची किंमत कमीच .

   हेच पुढे  तिच्या  शिक्षण , करियर ,निर्णय ,आवडी आणि नात्यां च्या बाबतीत होत , तिच्या  या सगळ्या गोष्टीं दुय्यम ठरवल्या जातात.

    असो, भारतीय स्रीयांची  स्थिती म्हणे सौदी आणि तुर्किच्या स्रीयां पेक्षा ही खालची आहे हे एका अभ्यासात दिसून आले आहे .

    तरी ही काहि लेकी या बाबतित खरच वाखाणन्या जोग काम करतायेत ,लेक म्हणून प्रेम तर आहेच आणि लेकाला लाजवेल इतकी उत्तम रित्या त्या आपल्या आई वडिलांची जबाबदारी घेतानां ,ति निभावतांना दिसून येतात.

     यातल माझ्या बघण्यातल उदाहरण या मायलेकी👇

मुग्धा केळकर आणि त्यांच्या आई .यांनी जसी सासु-सासरयांची जिव्हाळ्यान सेवा केली , तसच आई ला ही एकट पडू दिल नाही ,चालत फिरत होती तेव्हा आईची सगळी हौस पुरवली ,तिचा स्वाभिमान जपत तिचा भक्कम आधार बनली आणि आत्ता या क्षणात जिथे आई ला लहान बाळा सारख जपाव लागत तेव्हा आईच्या मायेन  सोबत राहून  सगळ करतेय .
      खरच वाटत अश्या लेकी आणि सुना असल्या  तर वृध्दाश्रमांची गरज उरणार नाही .
       हो यात त्यांना त्यांच्या पतिची म्हणजे एका जावयाची ही साथ मिळाली आणि जावई लेक होऊन जबाबदारी पारपाडत आहेत नव्हे ति आनंदाने निभवत आहेत .
  सॅल्युट अशा लेकी ला आणि जावयाला ही.
    आत्ता सुरू करूया का जशि सुनेने मुलगी होऊन सासु-सासरयांना साभांळाव तसच जावयाने ही मुलगा होऊन आपल्या जीवनात छान स गीफ्ट देणारया या जीवानां आदर आणि प्रेम द्याव अशी छान परंपरा .
    मुली कडे रहायला न आवडणारया पालकानां ही मग जावई परका वाटणार नाही आणि दोन्ही कुटुंब जोडणारी लग्न ही परंपरा खरोखरीच दोन्ही कुटुंब जोडणारी होईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)