आम्ही शाळा बाह्यच ,शाळा येईल का आमच्या पर्यंत?



   रस्त्याच्या बाजुला परराज्यातुन आलेली चार/पाच बिरहाड्,छोट्या  टेंम्पोमध्ये सगळ सामान ,अगदी चुली पासून तर खाटी पर्यंत,विकायच्या वस्तु ,मुलबाळ सगळच गाडीत."संसार आँन व्हील्स्"
    सकाळी बाहेर चुल मांडून चहा ,स्वयंपाक  करायचा व दिवस उगवला तसा व्यवसाय सुरू.

   काही दुकानांन वर फक्त मुलच ते सांभाळत होती.त्या बहुतेक मुलीच होत्या .लहान भावंड सांभाळन  ,घरातली छोटी मोठी काम करन, आपल्या कडच्या सामान्य घरातिल मुली जे करतात तेच अनेक मुलींनच्या वाट्याला येत .मग कसली शाळा अन कसल शिक्षण .

        जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत तिथे शिक्षण लांबच.

आपल्या भागात शाळाबाह्य मुलांच सर्वेक्षण सुरू आहे.सरसकट सगळ्याच घरात मुल शाळेत जातात का ? अस एखाद मुल आहे का  जे शाळेत जातच नाही ? या प्रश्ना वर आश्चर्यच वाटल कारण सुखवस्तु घरातिल सगळीच मुलं जनरली शाळेत जातातच ,यांच्या शिक्षणाच्या बाबतित पालक जरा जास्तच जागरूक असतात ,मग हे सर्वेक्षण सगळी कडे कशा साठी?

       वाड्या ,वस्त्या ,कष्टकरी ,कामकरी लोकांच्यात  मुल शाळेत घालण आई वडिलांना गरजेच वाटत नाही म्हणा किंवा परवडत नाही.काही शिक्षकांच्या प्रयत्नांनी मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेत यायला लागतात. मंध्यान भोजन ,कधि गणवेश ,कधि आणिक काही मिळेल या आशेवर शाळेत येणारी बरिच मुल असतात.

         पण शिक्षण का ? कशासाठी घ्यायच असत याच फारस महत्व या लोकानां कळलेलच नसत त्यामुळे ही लेकर बालपणाच्या या महत्वाच्या बालहक्काला मुकतात.

       कामावर पाठवून थोडा आर्थीक वाटा उचलत असतील तर पालक त्यानां कामावर पाठवतात,काही वेळा घरी लहान भावंड असतिल तर त्यांना सांभाळायला मुलांना घरी ठेवल जात, बहुतेक वेळा हे काम मुलीं कडे येत.

       जिथे या मुलांना शाळेत जाता येत नाही तिथे सतत भटकंती करावी लागणारयांच तर विचारायलाच नको.स्थलांतरीतांचे बीकट प्रश्न ,विशेषत:  जे वर्षातले काही महिने आपल गाव आणि घर सोडून भटकत असतात त्यांच्या वाट्याला शाळा येतच नाही.  

          मेंढपाळ, ऊसतोड कामगार काही वडार,डोंबारी  आणि असे इतर जे भंटकंती करत आपला उदरनिर्वाह करत असतात त्यांची मुल नेहमीच शाळा बाह्यच राहतात.

     बरयाच सामाजीक संस्था या मुलांसाठी "स्कुल आँन व्हिल्स्" हा उपक्रम चालवतात पण त्याची संख्या कमीच------

   पण अशा मुलां साठी जरा नियम (म्हणजे जन्माचा दाखला वगैरे) बाजुला ठेऊन अशी काही व्यवस्था नाही करता येणार का?ज्या मुळे मुल शाळेचा अनुभव घेऊ शकतील ? चार भिंतींची नाही पण तरी त्यांना ही अशी शाळा अनुभवता येईल ज्यात पुस्तकातल तर  शिकवले जाईलच पण खेळ ,कला याचाही आनंद मिळवता येईल.

      खरच आपल्याला शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण मुलानां शाळेपर्यंत पोहचवण्या साठी करायचेय का?

      काय फरक पडतो मुलं शाळेत आली काय ? किंवा शाळा मुलां पर्यंत गेली काय? खरच उद्देश योग्य असेल आणि तो पुर्ण करायची तळमळ असेल तर हे शक्य आहे च की ,मुलां पर्यंत शाळा नक्की पोहचेल. 

    


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)