नभोमंडळी अवतरला आदित्य

नभोमंडळी किरणे अवतरली , सुर्याच्या येण्याची चाहूल लागली. आसमंत सकाळी, संध्याकाळी व दिवसाच्या कुठल्याही प्रहरी वेगवेगळे दिसते . प्रत्येक वेळी त्याच्यात वेगळ काहीतरी शोधन्याचा हे मन प्रयत्न करत. याच प्रयत्नात मग हातातला मोबाईल त्या दृश्याला कैद करू पाहतो. चित्रकाराला त्याच्या कँनव्हासवर नवनवे चित्र रेखाटायचे असतात मग हा तर सृष्टीचा चित्रकार . या चित्रांची नेहमीच मनाला भुरळ पडते मग हेच मन ते कुठेतरी नोंद करून ठेवत आणि हे लिहील जात.