आपलाची संवादू आपणासी
" स्व " संवाद ,आपला स्वत:शी संवाद .हा रामबाण इलाज म्हणावा लागेल जेव्हा आजच्या सारखी परिस्थिती उद्भवते.
म्हणजे म्हटल तर नेहमी घरात नसणारे आपल्या आजुबाजुलाच असतिल आणि तरी ही येणारं ऐकटेपण !
भक्तिमार्गात अनेकदा देवाशी संवाद करतानां भक्त दिसून येतात किंवा त्यांच्यात आणि देवात एक निराळच नात निर्माण होऊन हा संवाद चालू असतो,मग विठुमाऊली होतो ,कृष्ण सखा होतो.
अध्यात्मात पण त्या जगन्नियत्या जगत् पित्याशी संवाद साधला जातो ज्याला "साधना", "योग", "मेडीटेशन " म्हटल जात.यात स्वत: पासून सुरू करून त्या विश्वविधात्याशी संवाद साधला जातो.
आधि "स्व " म्हणजे मी ,यालाच शोधल पाहिजे अस आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर तिव्रतेने वाटत. हे वाटन कधि कधि सुखावून जात ,यातून कुठेतरी दाबून ठेवलेल्या माझ्या मी शी परत एकदा भेट होते.मग ती लहानपणातल्या निरागस मुलीशी ,जी सगळी नाती सारखीच समजत असते कुठल्याही भेदभावा शिवाय ,ज्यात आपल -परक,सख्ख-चुलत अशी कुठलीच लेबल्स् नसतात.
तर कधि सापडते ध्येयवेडी जिला फक्त ध्येय दिसत कुठल्याही बंधनाशिवाय गाठायच असत ते ,
कधि भेटते एक वेडी लेक जीच विश्व बाप असतो आणि त्याच्या सुखा साठी तिची काहीही करायची तयारी असते.
अश्या आणि अनेक गाडून टाकलेल्या ती ,तिला भेटतात.
पुढे ही कुठे तरी हरवून जाते .आजूबाजूला अनेक नात्यांचे जाळे विणले जात असते ,ति यात पुरती गुंतून जाते. स्व : ला विसरते.
हे स्व: ला विसरणे तिला इतरांचा स्विकार करायला मदत करत.
अशी अनेक दशक ती स्व: ला विसरून जाते.मग तिची गरज असणारयांची संख्या हळूहळू कमी होते मग येत एक रितेपण -------------
मग ति परत तिचा शोध घेते.यातच एक संवाद सुरू होतो "स्व"संवाद .
गोंधळलेली ,बावरलेली ती शोधते स्वत:ला जुन्या फोटोत,मुलांच्या लहाणपणिच्या झबल्या-टोपड्यात,स्वयंपाकघरातल्या तिने गोळा केलेल्या भांड्याकुड्यात,कधि आजुबाजुला तिचा हातधरून वाढलेल्या झाडाझुडपात,कधि धुळ साचलेल्या तिच्या प्रमाणपत्रात तर कधि नंतर वाचू म्हणून मांडून ठेवलेल्या पुस्तकांच्या थप्पीत.
बरच मागे पडलेल असत हे सगळ ,पण यातल्या प्रत्येक गोष्टीत तिचा जीव असतोच.
मग तिचा गोंधळ अजूनच वाढतो . यातच जुन्या मैत्रीणी परत पुढ्यात येतात त्या माझ्या आत्ताच्या" मी "शी पूर्विच्या "मी" ला कंम्पेअर करतात ,माझ्या बावळट झालेल्या अवतारावर बोट ठेवतात,माझ्या बिचारे पणाची किव करतात.
मी हतबल होते ,स्री स्वातंत्र्यावर शिक्षकांशी पंगा घेणारी मी मी कुठेय? कुठेय मी?
मनात अनेक द्वंद्व चालतात आणि इतक्या वर्षात नमत घ्यायची सवय लागलेल मन परत शांत होत .तिला कुणाशीच आत्ता वाद नको असतात किंवा अपेक्षा ठेवण ही ति सोडत आलेली असते(अपेक्षा -भंगा ) पेक्षा उत्तम मार्ग.
सगळी वादळ आत्ता तिच्या पासून दूर गेलेली असतात नव्हे तिला त्यांना आत्ता झेलायच नसतच मुळी.
मग ति परत स्वत: पाशिच येते आणि तिचा तिचा छान, संयमित,संतूष्ट, स्विकाराचा संवाद चालू होतो.
तिच स्वत: भोवतीच जग तिच स्वत:च अस.
"स्व -संवाद " ज्यात कुणाच समजून न घेण दुखवत नाही, कुणी टाळतय याची ही शक्यता नाही,कुणाला वेळ नाही अस ही नाही, कारण हा कोण ?कोणच मुळी नाहीच आहे फक्त ती ती आणि ती .
स्वत:शीच नव्याने जुळलेले सूर हलकेच गालावर हसू आणतात ,कोण मला काय म्हणेल हे विचार आत्ता दूरच पळतात.
मला मीच शोधलय आत्ता आणि हा" स्व -संवाद "अखंड चालू राहील माझ्या सोबत "Till the end of me!"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा