नवचैतन्य सृष्टी
शिशिराचि पानगळ संपून चैत्रपालवी फुलली ,जुने जाऊन कोवळी रंगित पान झाडाच्या अंगाखांद्यावर खेळायला लागली.
क्या हे प्रभू तेरी लिला
सुरज की तपीश बढी
पोधे उजडे हुए
फिर घनी पत्तीयों से भर दिये
छाँव थंडी देने तुने परिंदोको
क्या घने पेंड कर दिये?
अस काहीस वाटून जात,किती गम्मत म्हणावी निशपर्ण झालेली झाड ऊन वाढायला लागल तशी गर्द पानांनी भरून गेली ,वसंतपंचमी चा वसंतोत्सव सुरू झाला ,पाहील का मागच पिंपळाच झाड कोवळ्या पानांच्या विशिष्ट रंगात हळूहळू रंगू लागलय . हा संदेश नव्या आशेचा, कि जुन गेल तर नविन येणारच आहे तसच दु:खा नंतर सुख ही येणारच.कुठलीच गोष्ट कायम राहत नाही फक्त आपल अस्तित्व कस टिकवून ठेवायच हे आपल्यावर अवलंबून असत.
आजच्य परिस्थितीत हेच सांगण आहे ,हा करोना कधी तरी जाईलच कदाचित आपण त्याच्या सोबत सवईन राहायल लागू किंवा तो आपल्या वर असर करेनासा होईल किंवा बरिच मोठी उलथापलथ करून ,आपल्या ला नविन काही चांगल्या सवई लावून जाईल.
असो या चैतन्योत्सवाच्या नविन पर्वाच्या सगळ्या निसर्ग प्रेमी मानवानां ,या सृष्टीतल्या समस्त जीवांना खुप खुप शुभेच्छा🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा