तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

 आज गृहीणी दिवस,म्हणे गृहीणी म्हणजे सगळ घर तिच्या ऋणात असते अशी ती गृहिणी. पण सगळ्या जगा नि तिच्या ऋणात असाव अशी ती आहे .जगात जन्म दात्री ,पालन करती म्हणून आजही तिच आहे आणि  तेच तिचे काम म्हणून तिला चुल आणि मूल यात अडकवल गेलय .या कामाला पर्याय नाही पण तिच हे काम म्हणजे तिची ड्युटी आणि ति ते करते त्यात अस विशेष काही नाही ,त्या कामाला तशी इतरांच्या लेखी किम्मत नाही .फक्त जगात आज स्री दाक्षिण्य दाखवण्याची फॅशन आहे किंवा जशी इतर चांगुलपणाची नाटक चालू असतात तसेच हे पण म्हणजे इतरां समोर घरातल्या स्त्री चा सन्मान करायचा , तिच्या नावाची प्रापर्टी ,मिरवायला ती .पण तिला कुठल्याच निर्णयाचे स्वातंत्र्य नाही म्हणजे तिच्या स्वत: च्या बाबतीतले, मुलांचे आणि आर्थिक ही .तस तिला काडीची अक्कल नसते , तु बिंडोक आहेस ,तुला काय कळतय त्यातल अस म्हणनारे ही तिच्या आजूबाजूला अनेक असतात.

     खरतर वर्षानु वर्षे अस ऐकून खाली मान घालून ,निमूट पणे काम करणारया गृहिणी आदर्शच वाटतात. नाहीतर आपल्या हक्कांची जाणीव असून सतत धुसपुस करत स्वातंत्र्या साठी भांडणारया पण तरीही त्यातून बाहेर न पडू शकणारयाच. उगाचच का सावित्री बाईंनी आपल्याला शिक्षीत करण्याचा घाट घातला अस वाटत.


वरच्या व्हिडीओत या तिघी ही अगदी सराइत पणे हे त्यांच्या संसाराच गाड हाकताहेत प्रत्यक्षात आणि असही त्यांच्या खांद्यावर घरसंसाराच्या जबाबदारीच ओझ असणारच.

   पुढे भराभर  पाई चालणारी ती त्यांच्या मार्गातले अडथळे दुर करतेय . 

       प्रत्येक स्री मग ती शिकलेली असो की अशिक्षीत पण जबाबदारी पडली कि ती चोखपणे ,जिवाची बाजी लाऊन पूर्ण करते.

      पुरूषांच्या बाबतीत एखादा ऐदखाऊ,आई,बायको किंवा बहिणीच्या जीवावर बसुन खाणारा ,वर त्याच व्यसन पूर्ण करण्या साठी त्यांना मारहाण करणारा असा पुरूष ऐकवेळ समाज ऐकसेप्ट करतो पण हेच बाईने घरातली काम नाही केली तर? 

  सगळ्या जबाबदारया ,कर्तव्ये तिची तिने पूर्ण करण हा अलिखीत नियम आहे.वर तिच्या साठी अधिकार हा शब्द उच्चारणे ही पाप .हो म्हणजे तिच्या नवरयावर फक्त तिचाच अधिकार असतो ,ती तिच कुंकू कुणासोबत वाटत नाही हे निॆखालस तिच्या बायको या पद्विला सामाजिक सुरक्षिततेचे कोंदण पुरवणार खोटारडा असा आभास  निर्माण करणार अस  आहे.

      ति आणि तो यांच्या कर्तव्यात आणि अधिकारात किती तफावत आहे ते बघुया (काही सन्माननिय अपवाद वगळता)

तिची कर्तव्ये :1-मुलांच संगोपन ( यात जन्म देण्या पासून तर त्याच्या /तिच्या लग्न वा नातवंडा पर्यंतची अनेक काम जी मांडायला एक अख्खा ग्रंथ लिहावा लागेल.)

2- घरातली काम (ज्या घरात नोकर आहेत ,त्यांना ते जरा कमी)सकाळच्या कामां पासून सुरू करा  ,एक आई ,बायको काय काय करते?

3- सासरची नाती सांभाळते  (अजूनही माहेर तिने ही सांभाळायच असत असा नियम नाही / काही अपवाद वगळता)

4 - घरात कुणीआजारी असल तर त्याची जबाबदारी फक्त तिचीच असते.

5-पाहुणा रावळा आला तर त्यांच करण हे तिचच काम आहे.

अशी अनेक कर्तव्ये ही फक्त तिचीच.

आत्ता तो करत असलेली कर्तव्ये बघुया.

1 - पैसे कमवून आणने.(जे आत्ता तिही करतेच)

2- तुमच्या घरातिल पुरूष कुठल घरातल काम करतात?

3-त्याला अशी काही नियमावली  नाही.

4-काही मोठ्या आजारात हाॅस्पिटलाईज करणे ऐवढेच.

5- ईथेही त्याच अस काही कर्तव्य नसतच.

आत्ता अधिकार   

तिचे - असे काही नाही .म्हणजे स्वयंपाक घर तिच पण सगळ्यांना आवडत तेच ति करत असते.

घर तिच पण काय ? किती ? कुठे ?कस ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर:- तो जस म्हणेल तस .

तिला कुठे जायच असेल तर घरात सर्वांच्या सोईने ती बाहेर पडते पण तरीही तिला परवाणगी घ्यावीच लागते.

मग ते माहेरी असो किंवा तिचा छंद ,तिच्या मैत्री खातर असो परवनगी लागतेच ,नाही  तर तिला बेजबाबदार ठरवल जात .तिन कुणा सोबत रहाव हे ही तोच ठरवतो ,कारण वयाना कितीही मोठी झाली तरी ति संगतीने बिगडन्याची (विशेष ज्या बायका स्वंतत्र विचारांच्या, त्यांच्या लेखी बिनधास्त असतात.)भीती त्याला असते.

    या उलट त्याचे अधिकार

सगळे अधिकार त्याचेच असतात ,त्याला कुठलाही नियम नसतो.

तो केव्हाही, कुठेही ,कुणाला न सांगता (विचारणे त्याच्या पुरूषत्वाला न शोभणारे असे असते) कितीही वेळ,कुणाही सोबत जाऊ शकतो.

 त्याची प्रत्येक कृती त्याच्या व्यवसायाला गरजेची आहे अस त्याच म्हणन असत.

म्हणजे रात्री बसावच लागत🍻

त्या शिवाय काम होत नाहीत.मग तो रोज सोबत करणारा ,रिकाम टेकडा मित्र असला तरी.

वाईट प्रवृत्ती ही सोबत बाळगावीच लागते ,आजची गरज आहे .

हे आणि असच असत.असच राहणार असत.

हे असले नियम आणि असले समज .

    हा तमाशा आयुश्य भर उघड्या डोळ्यांनी बघत आणि समानता ,स्वातंत्र्य हे दुसरयाच कुणा साठी आहे माझ्या साठी नाही हे  समजून घेऊन ती जगत असते कि मर मर मरत असते.

  असो पण जिथे पक्ष्याला पिंजरयातून उडण्याची आसते ,त्याच स्वातंत्र्यावरच प्रेम आपण मान्य करतो. म्हणजे दुसरयाच्या स्वातंत्र्याचा आदर करा अशी शिकवण शालेय जीवना पासून मुलांना देतो(हो अश्या धड्याचा समावेश मुलांच्या अभ्यास क्रमात करण्यात आला आहे) पण घरात       आई,बायको,बहीण,सुन यांना ही ते लागू करायला न्यायालयात जाव लागेल का?

समाज म्हणून क्रांती घडली नाही तर स्वांतत्र्याची आस अन कास धरणारया मुली घटस्पोट व लिव ईन चा अवलंब करतिल. कारण लग्न या संकल्पनेवर चा विश्वास त्यांची आई,मावशी ,काकू जगत असलेल्या वैवाहीक (बंदिस्त)जीवना मुळे उडालेला असेल.

   So,let's change the thoughts and change the world for her also .

   म्हणजे घराघरातले "बबडे" आणि तसेच बबडे असलेले त्यांचे बाब बदलावेच लागतील.

ति ,तिच अस स्वतंत्र अस्तित्व मान्य करून ,तिला तिची अशी स्पेस दयावीच लागेल ,

  तेव्हा हे आसमंत तिच्या विस्तीर्ण पंखानी व्यापल जाईल अन घरोघरी ,संपूर्ण जगात आनंदाची अशी नवी पहाट येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)