लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)


 लेक सांगते माझी कथा 

जणू समोर हा आरसा

कंठ दाटून हा येतो

जेव्हा मनीचे गुपित 

ति सांगते न बोलता

एक एक क्षण नेई

जणू मागे हा आरसा 

पोटी आल लेण सुरेख 

देते आनंदाचा वसा

लेक सखी होते सख्खी माझी

कळे तिला व्यथा अंतरीची

शब्दांविना संवाद चाले मनिचा मनात

कधि डोळ्यांची ति भाषा

डोळ्यातच हसण होई 

अन अश्रृशिवाय रडण

नाळ नाळेशी जुळली 

मने मनात गुंतली

मायलेकिच्या नात्याची

सुंदर भावना गुंफली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास