लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली
सावित्रीबाईनीं मुलीं साठी शिक्षणाची दार उघडली 1848 मधे.त्या नंतर तर आजपावेतो बरीच दार आपल्या साठी उघडली गेलीत . ति उघडण्याचा वेग खुपच हळु आहे खरतर. म्हणजे बघा 170/171वर्ष झालीत या घटनेला . पण सगळ्याच मुलींना अजुनही त्यांच्या स्वत:च्या विकासा साठी त्यांना हव ते शिकायची परवानगी नाही. इतकच काय पण सगळ्याच मुलींना अजुनही शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाहीत .
सगळेच बदल सामाजिक उतरंडी नुसार म्हणजे उच्चवर्गा कडून खालच्या स्थरातिल नागरिकां मधे घडुन येतानां दिसुन येतात.
मग ते सोहळे साजरे करण असो ,खानपानाच्या सवई असोत,फॅशन असो किंवा परिवर्तन असो .
आपल्या देशात पौराणिक काळा पासुनच स्त्रिया शिकत पण त्या विशिष्ट वर्गातल्याच.आजच्या सारख सर्वांसाठी शिक्षण नव्हत.मग त्या स्त्रिया असोत कि अजुन कुठल्या दृष्टीने खालच्या दर्जाचा ठरवला गेलेला सामाजातिल एक घटक.
एकलव्य आणि कर्ण यांच्या वर या बाबतित झालेला अन्याय सर्वश्रृत आहे.
नंतर राजे महाराजांच्या काळात पण बरयाच राजकन्या शिकल्यात . तरी जसा मनिकर्णिका (झाशीची राणी लक्ष्मी बाई)व अहिल्या बाई होळकरांच्या शिक्षणाला काहींनी विरोध केला. पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्यातल्या गुणांनची पारख असलेल्या काहि पुरूषांनिच त्यांना शिक्षण घेण्या साठी प्रोत्साहित केल, साथ दिली.
त्या काळात शिकलेल्या अश्या काहि मोजक्याच स्रिया होत्या.
पुढे राजा राम मोहन राॅय, इश्वरचंद्र विद्यासागर,महात्मा ज्योतिबा फुले,बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिंना स्त्रीयांच्या होणारया शोषणाची जाणीव झाली.
इंग्रजी शिक्षण घेताना आपल्या देशातल्या स्त्रियांच्या मागासले पणात त्यांना तिला शिक्षीत करून समर्थ बनवण्याचा मार्ग गवसला.
या मार्गात सावित्रीला शिक्षण देऊन ज्योतिबांनी नविन इतिहास रचला (असा ज्योतिबा सगळ्याच सावित्रींच्या आयुष्यात येत नाही हे आहेच ).
त्यातुन भिडे वाड्यात मुलीं साठीची पहिली शाळा या स्री शिक्षणाची प्रकाश वाट दावणारया सावित्री ज्योतिबा जोडीने सुरू केली.
या साठीचा संघर्ष अंगावर काटा आणनारा होता .पण कुणा साठी काही तरी करण्याच्या उर्मितुनच आपल्या समाज सुधारकांनि वेळोवेळी समाजाचा रोष पत्करून अनेक महान कार्य केलीत.
असो त्या नंतर पुढारलेल्या विचारांच्या कुटुंबांनी आपल्या मुलींना शिक्षण दिल .
पण तेही मोजक्याच मुलींच्या बाबतित घडल.शांताबाई शेळके, सुधा मुर्ती,लीना सेठ ,किरण बेदी अश्या काही मोजक्या पहिल्या पहिल्या ठरलेल्या डिग्री मिळवणारया ,पद भुषवणारया स्रीयां च्या बाबतीत वाचनात आलय.
आता आमच्या पिढी बाबत बोलायच झाल्यास ज्यांना करियर करता याव म्हणून शिक्षण दिल गेल त्यांची संख्या 25% ही नाही पण डिग्री घेणारया मुलींची संख्या तर खुप आहे ? हो! पण ती फक्त वरसंशोधनात बायोडाटावर टाकता याव म्हणून.त्यात सासरचे मिरवतात मुलगी किंवा सुन उच्चशिक्षीत आहे , भविष्यातिल मुलांना फुकट शिक्षीकेची सोय झाली वा अजुन काही त्यांचा उद्देश असावा . हो यातल्या एखादिला मिळतो ज्योतिबा मग तिही फिनीक्स सारखी भरारी घेते मोठ्या लग्नां नंतरच्या ब्रेक नंतरही.
पण-------
कालच माझ्या बालमैत्रीणी गप्पा मारतांना सांगत होत्या की त्यांचे वडिल त्यांना म्हणतात तु खुप शिक ,काही तरी बन.
आई म्हणते काही तरी करून दाखव ,पैसे कमव ,स्वावलंबी हो! कुणावर अवलंबून राहू नको.भरपुर शिक आपल्या पायावर ऊभी रहा नाही तर कोणि किंमत देत नाही /करत नाही.
वरचे आईचे संवाद माझ्या पिढीतल्या बायकांचे आहेत आणि या आया त्यांच्या नशिबात किंवा आयुष्यात आलेल्या अनुभवां वरून आपल्या लेकींच्या वाट्याला हे येऊ नये या साठी त्यांना सारख प्रेरित करतात.मागेही लागत असतील कदाचीत पण हि त्यांच्या उज्वल भविष्या साठीची आईची तळमळच आहे नाही का?
आज रांगोळ्या ,भतरकाम-विणकाम शिकवण्या पेक्षा मुलींना जुडो -कराटे शिकवले जातायत हे समाज परिवर्तनाचे 'सु-चिन्हच' म्हणावे लागेल.
त्या मुलिंच्या संवादा नंतर आजच्या वर्तमान पत्रात आलेल्या आजच्या सामाजीक परिवर्तनाच , स्री शिक्षणासाठी पुढाकार घेणारया एका बापाच बोलक चित्र बघुन भविष्यात या मार्गात आशेचे किरण नाही तर प्रकाश झोत दिसतिल अस वाटतय.
मग मुलीं साठीची स्वप्न बदलु लागलियत ,तिच्यातला दुर्गा - सरस्वतिला पालक ओळखायला लागलेत.
"मुलगी शिकली प्रगती झाली"
"बोझ नही वो ज्योत है ,करती उजाला दो घरों में
पँढाओ उसे तो आगे बढेंगी ,
बाबा तेरे बुढापेंका तो वों सहरा बनेगी"
या वर विश्वास ठेवनारा बाबा आता लेकींना भेटलाय.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा