निस्वार्थ मदतिचा योग्य पुरस्कार

एक अशिक्षीत गरिब स्री ,जी कुठलाही विचार न करता अनोळखी मुलिला लवकर उपचार मिळावे म्हणून स्वत:च्या अंगावरची साडी काढून देते , हा माणुसकी जिवंत असल्याचा दाखला व तिला तिच्या या कार्या साठी हा पुरस्कार दिला जातोय हे आपल्या निस्वार्थ कार्याची दखल कुठेतरी कुणितरी घेत असत याच उत्तम उदाहरण . खरतर त्या अपघाताच्या घटने नंतर जस माध्यमां द्वारे हे आपल्या पर्यंत पोहचल त्या नंतर विमल बाई व त्या वेळी त्या वैमानिक मुलिला अनेक कि .मी . पायी चालत उपचारा साठी नेणारया युवकांना अनेक मंडळींनी बक्षीस दिलीत ,त्यांचे सत्कार झालेत. यात विशेष सांगायच कि शहरातल्या मोबाईल वेड्यां सारखे ते बघे झाले नाहीत आणि स्वत: केलेलेल्या मदतिचा गवगवा करत लाईक्स च्या भानगडीतही पडले नाही. पण तरीहि त्यांच्या कामाला प्रसिध्दि मिळाली आणि सन्मानही जो तात्पुरता नाहीय. हि निरागस ,भोळी माणस आपल माणुसपण जपुन जगत असतात ,आपल्या सारखे स्वार्थ आणि दिखाऊ पणा पासून लांब . ...