एक अशिक्षीत गरिब स्री ,जी कुठलाही विचार न करता अनोळखी मुलिला लवकर उपचार मिळावे म्हणून स्वत:च्या अंगावरची साडी काढून देते , हा माणुसकी जिवंत असल्याचा दाखला व तिला तिच्या या कार्या साठी हा पुरस्कार दिला जातोय हे आपल्या निस्वार्थ कार्याची दखल कुठेतरी कुणितरी घेत असत याच उत्तम उदाहरण .
खरतर त्या अपघाताच्या घटने नंतर जस माध्यमां द्वारे हे आपल्या पर्यंत पोहचल त्या नंतर विमल बाई व त्या वेळी त्या वैमानिक मुलिला अनेक कि .मी . पायी चालत उपचारा साठी नेणारया युवकांना अनेक मंडळींनी बक्षीस दिलीत ,त्यांचे सत्कार झालेत.
यात विशेष सांगायच कि शहरातल्या मोबाईल वेड्यां सारखे ते बघे झाले नाहीत आणि स्वत: केलेलेल्या मदतिचा गवगवा करत लाईक्स च्या भानगडीतही पडले नाही.
पण तरीहि त्यांच्या कामाला प्रसिध्दि मिळाली आणि सन्मानही जो तात्पुरता नाहीय.
हि निरागस ,भोळी माणस आपल माणुसपण जपुन जगत असतात ,आपल्या सारखे स्वार्थ आणि दिखाऊ पणा पासून लांब .
या कामांची दखल घेतली जातेच म्हणजे बघा कुपोषित
मुलां साठी काम करणारी ऐक आशा वर्कर जीची दखल थेट WHO घेते आणि पुढील चित्रात असलेली पद्मश्री या उच्चतम पुरस्काराने गौरवली गेलेली महान मंडळी यातल्या राहीबाई पेरे या अशिक्षीत पण ज्या चिकाटीन त्या बीज संगोपन करत आल्या त्याचा हा सन्मान आणि तुलसी गोडा यांच ही खास योगदान आहे वृक्षराजींशी असलेल त्यांच नात त्यातली माहीती आणि ते टिकवण्या साठी च त्यांच योगदान याला सलाम .
या पप्पमाल वय वर्षे फक्त105 त्या या वयातही शेतात काम करतात त्यांना त्यांच्या Organic( सेंद्रीय) शेती साठी संन्मानित केल गेल.

हे रणजीतसिंह दिसले ये ग्लोबली गौरवान्विंत केले गेलेले शिक्षक.
आणखीन ही बरीच अशी मंडळी आहे जी देशाच्या वा जगाच्या कान्या कोपरयात कधि निसर्ग संवर्धना साठी तर कधी इतरांची सेवा करण्या साठी तर कधि दुसरयांच आयुष्य सुखकर होण्या साठी कार्यरत आहे जी कधी ही प्रसिध्दिच्या मागे लागली नाही कुठे तरी अविरत आपल काम करत राहीली पण केव्हा तरी त्याची दखल घेतलीच जाते.
आपल्या पुराणातल एक वचन या प्रसंगी आठवत जे कृष्णाने अर्जुनाला सांगीतल ," कर्मण्ये वाधिकारस्ये ,मा फलेशु कदाचन्" माझा संस्कृत विषय नाही त्यामुळे यात चुक असु शकते पण सांगण्याचा उद्देश हा कि कुठल्याही फळाची आशा केल्या शिवाय कर्म करत रहावे आणि ती कर्म चांगली असली तर देव दरबारात त्याची दखल घेतली जातेच पण या जगाच्या रंमंचावरही तुम्ही कुठल्या तरी पुरस्काराचे धनि होताच आणि रिल नाही तर रियल लाईफ हिरोचा पुरस्कार नक्की पटकावता मग तो लोकां कडून मिळणारया खरया सन्मांनाच्या रूपात असो कि भरभरून मिळणारया खरया प्रेमाच्या रूपात त्या साठी तुम्हाला राजकारण्यांन सारख सेवेच बाजारी करण किंवा देखवा करायची अजीबात गरज पडत नाही आणि त्यांच्या सारखे विकत घेऊन मुजरे करून घेण्यारयांची ही.
असो तर मुद्दा काय ? तर,
" कर्म किये जा फल कि चिंता मत कर ये इन्सान ,
तु जो कर्म करेंगा उसका फल जरूरू देगा भगवान😄
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा