आज गृहीणी दिवस,म्हणे गृहीणी म्हणजे सगळ घर तिच्या ऋणात असते अशी ती गृहिणी. पण सगळ्या जगा नि तिच्या ऋणात असाव अशी ती आहे .जगात जन्म दात्री ,पालन करती म्हणून आजही तिच आहे आणि तेच तिचे काम म्हणून तिला चुल आणि मूल यात अडकवल गेलय .या कामाला पर्याय नाही पण तिच हे काम म्हणजे तिची ड्युटी आणि ति ते करते त्यात अस विशेष काही नाही ,त्या कामाला तशी इतरांच्या लेखी किम्मत नाही .फक्त जगात आज स्री दाक्षिण्य दाखवण्याची फॅशन आहे किंवा जशी इतर चांगुलपणाची नाटक चालू असतात तसेच हे पण म्हणजे इतरां समोर घरातल्या स्त्री चा सन्मान करायचा , तिच्या नावाची प्रापर्टी ,मिरवायला ती .पण तिला कुठल्याच निर्णयाचे स्वातंत्र्य नाही म्हणजे तिच्या स्वत: च्या बाबतीतले, मुलांचे आणि आर्थिक ही .तस तिला काडीची अक्कल नसते , तु बिंडोक आहेस ,तुला काय कळतय त्यातल अस म्हणनारे ही तिच्या आजूबाजूला अनेक असतात. खरतर वर्षानु वर्षे अस ऐकून खाली मान घालून ,निमूट पणे काम करणारया गृहिणी आदर्शच वाटतात. नाहीतर आपल्या हक्कांची जाणीव असून सतत धुसपुस करत स्वातंत्र्या साठी भांडणारया पण तरीही त्यातून बाहेर न पडू शकणारयाच...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा