पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेरे घर आई एक नन्ही परी

      आज ती आली  अखेरीस  जीची  सगळेच खुप आतुरतेन वाट बघत होते.        ती आज मागचे सगळे पाश तोडुन आली होती जन्म दात्या आईला व तीच्या सोबत या जगात आलेल्या भावाला.      सीमा आणि अरुण ची ही जुळी लेकर , ती जगात यायच्या आधीच  नियतीन या लेकरांचा बाप हिराउन घेतला.    सीमा ची या आधीच दोन मुल होती त्यात अरुण च्या अचानक जाण्याने आधीची दोन आणि आत्ता ही जुळी ,तीला या चौघांच संगोपण उत्तम रित्या करन व्यवहारीक दृष्ट्या शक्य नव्हत तेव्हा तीला तीच्या भावान ही मुल दत्तक द्यायचा सल्ला दिला.   एका आई साठी हा निर्णय घेण सोप नव्हत, पण तीचा हा निर्णय तीच व या चारही लेकरांच पुढच आयुष्य सुकर करायला योग्य ठरणार होता .    अरुणच्या एका मित्राची  बायको अश्या जोडप्यांना ओळखत होती जे मुलं व्हावीत म्हणुन अनेक वर्ष प्रयत्न करत होते पण त्यांना यश येत नव्हत व शेवटी मुल दत्तक घेण्याच्या निर्णय त्यांनी घेतला होता.तीन त्यां दोन जोडप्यानां संपर्क केला ,त्यांना सगळी परीस्थीती सांगीतली .त्या जोडप्यांनी तयारी दाखवली  . ...

अर्धांगिनी

           शेजारच्या सीटवर एक जोडप बसल होत,ती अंध अन तो अपंग बहुतेक पोलीयो ग्रस्त.          गाडी सुरू होताच त्यान पुडी काढली ,हातावर अंदाजाने तंबाखु घेतला आणि थोडा चुना घेवुन चांगला चोळला अर्थात तंबाखु खाणारयाच ठाउक तो कीती अन कसा चोळायचा मी आपल माझ निरीक्षण वर्णन केल.       असो, नंतर त्यान तो थोडा तीच्या हातावर ठेवला अन थोडा आपल्या गालात कोंबला .       मला आपली मजा वाटली, एरवी बायकोच काय ते नवरयाच्या हातात आयत देत असते आयत! हा सर्वसामान्य भारतीयांचा पायंडा.          ते बहुतेक कुठल्या तरी सवलती साठी अर्ज करायला जात असा असावेत अस एकंदरीत त्यांच्या गप्पां वरून वाटल.     हो दुसरयाच्या गप्पा ,बोलण ऐकण चुकीचय मला माहीत आहे  पण हे सहजच कानावर पडत होत अन पुस्तक वाचना बरोबर माणस वाचायची चटक लागलीय त्या शिवाय का तुमच्याशी हे शेअर करता येतय?        तो तीला विचारत होता ,"तुझा दाखला घेतलाय का ?"  "डाँक्टर न दिलेला कागद ,आधार कार्ड घेतलय?" ...

त्या तीघी

               अलका आणि तीच्या दोन लेकी अश्या तीघी एकमेकीं साठी.       मी त्या तीघीं शीवाय कुणीच त्यांच अस नात्यातल कधीच पाहील नाही,अशीच अलका कडे एणारी बरीच पुरूष मंडळी होती ,त्या वयात तसा काही सेंन्स नसल्यामुळे ते का येतात हे माहीत असण दुरच.     तीचा नवरा कोण होता ,काय करायचा काहीच कळल नाही ,अगदी  ती गाव सोडुन जाई पर्यंत.    तीघी ही काही घरची धुणी भांडी करायच्या आणि शेतातही जायच्या .    मोठी जया साधी ,शांत तर लता धाकटी दिसाय ला जया पेक्षा जरा उजवी व राहायलाही फँशनेबल.  आम्ही अलका ला काकु म्हणायचो व त्या दोघी ताया.घराच्या मागेच राहायच्या त्या त्या मुळे कामा साठी बोलवायला कधी उरलेल अन्न द्यायला जायचे.   काकुचा स्वभाव एकदम कडक,लेकीच घरातली सगळी काम करत आणि चुकल त्यांच तर काकु लाथाबुक्कयाने त्यांना मारत कधी कधी चटकेही देत,शिव्या तर नेहमीच्याच.       असा अवतार बघुन वाटे आपली आई कशी अन या कशा? सावत्र आई असतील का असा प्रश्न पडायचा.   जया ताई आमच्या आवडीची व ती स्वभ...

विशाखा विविध गुणांनी नटलेल व्यक्तीमत्व

       खरतर नावात काय आहे? अस म्हटल जात पण काही त्या नावाला सार्थ ठरवतात.       याच काही अवलीयां पैकी ती एक हो कारण अवलीयाच असलेली माणस जीवनात कितीही चढउतार येवोत ,सगळी कडे काळोखच काळोख दिसो पण यांना त्यातही नवा राग आवळायची हिच तर वेळ आहे !अस काहीस वाटत असत.       इला अभ्यासाची फार आवड ,आत्ताच नाही अगदी पुर्वी पासुन,म्हणजे डाँक्टर की चा अभ्यास,मग काय तर शासकीय सेवां साठीच्यां परिक्षा.           कधी  वकीलीचा अभ्यास तर कधी गाण्याचा. आहे की नाही विविधा ,म्हणजे वैद्यकीय ,वकीली कुठे आणि कलेतल गाण कुठे?      एवढच नाही ,मग वार्ली पेंटींग,पोट्रेट रांगोळी ,शीवणकाम आहेच .   संपल नाहीये अजुन बाई सुंदर नाचते देखील.कुठलही गाण तीला थीरकायला चालत म्हणा की ती कशा वरही उत्तम नाचु शकते.       आम्ही मैत्रीणी तिला कोकीळा म्हणतो,सकाळी तिच्या मधुर आवाजात अनेक जुनी गाणी ॆऐकली की मन तृप्त होत.     ती एक रोल माँडेल आहे सगळ्यां साठी म्हणजे काही वेळा तीच्या चांगल्या स...