त्या तीघी

               अलका आणि तीच्या दोन लेकी अश्या तीघी एकमेकीं साठी.
      मी त्या तीघीं शीवाय कुणीच त्यांच अस नात्यातल कधीच पाहील नाही,अशीच अलका कडे एणारी बरीच पुरूष मंडळी होती ,त्या वयात तसा काही सेंन्स नसल्यामुळे ते का येतात हे माहीत असण दुरच.
    तीचा नवरा कोण होता ,काय करायचा काहीच कळल नाही ,अगदी  ती गाव सोडुन जाई पर्यंत.
   तीघी ही काही घरची धुणी भांडी करायच्या आणि शेतातही
जायच्या .
   मोठी जया साधी ,शांत तर लता धाकटी दिसाय ला जया पेक्षा जरा उजवी व राहायलाही फँशनेबल.
 आम्ही अलका ला काकु म्हणायचो व त्या दोघी ताया.घराच्या मागेच राहायच्या त्या त्या मुळे कामा साठी बोलवायला कधी उरलेल अन्न द्यायला जायचे.
  काकुचा स्वभाव एकदम कडक,लेकीच घरातली सगळी काम करत आणि चुकल त्यांच तर काकु लाथाबुक्कयाने त्यांना मारत कधी कधी चटकेही देत,शिव्या तर नेहमीच्याच.
      असा अवतार बघुन वाटे आपली आई कशी अन या कशा? सावत्र आई असतील का असा प्रश्न पडायचा.
  जया ताई आमच्या आवडीची व ती स्वभावाने जास्तच गरीब म्हणुन तीची  दया ही येई.
    यथाअवकाश त्या वयात आल्या मग समाज नियमा प्रमाणे त्यांची लग्ण झालीत. जया ताईला बिजवराला दिल,त्याची पहीली बायको वारली होती व तीची तीन मुलही होती त्याला.
     जया ताईच्या स्वभावाने ,तीच्या प्रेमाने तीन सगळयांना आपलस केल . माहेरी न मिळालेला मानसन्मान तीला तीकडे मिळाला ,परीस्थीती चांगली म्हणुन कष्ट ही कमी झाले.
   तीने लताचही लग्ण करून दिल .
नंतर काकुही  गाव सोडुन गेल्या .
      काही नाती कायम त्यांच्यातल्या वेगळे पणाने आपल्या मनात प्रश्न निर्माण करुन जातात अश्या त्या तीघी  आजही माझ्या साठी गुढच आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)