अर्धांगिनी

           शेजारच्या सीटवर एक जोडप बसल होत,ती अंध अन तो अपंग बहुतेक पोलीयो ग्रस्त.
         गाडी सुरू होताच त्यान पुडी काढली ,हातावर अंदाजाने तंबाखु घेतला आणि थोडा चुना घेवुन चांगला चोळला अर्थात तंबाखु खाणारयाच ठाउक तो कीती अन कसा चोळायचा मी आपल माझ निरीक्षण वर्णन केल.
      असो, नंतर त्यान तो थोडा तीच्या हातावर ठेवला अन थोडा आपल्या गालात कोंबला .
      मला आपली मजा वाटली, एरवी बायकोच काय ते नवरयाच्या हातात आयत देत असते आयत! हा सर्वसामान्य भारतीयांचा पायंडा.
         ते बहुतेक कुठल्या तरी सवलती साठी अर्ज करायला जात असा असावेत अस एकंदरीत त्यांच्या गप्पां वरून वाटल.
    हो दुसरयाच्या गप्पा ,बोलण ऐकण चुकीचय मला माहीत आहे  पण हे सहजच कानावर पडत होत अन पुस्तक वाचना बरोबर माणस वाचायची चटक लागलीय त्या शिवाय का तुमच्याशी हे शेअर करता येतय?
       तो तीला विचारत होता ,"तुझा दाखला घेतलाय का ?"
 "डाँक्टर न दिलेला कागद ,आधार कार्ड घेतलय?"
      अश्या  प्रश्नाच्या उजळनीतच त्याने तीच्या हातातली पिशवी घेतली अन एक एक कागद तपासला.
     पुढे  बसमध्ये पाँपकाँर्न वाला आला तीन तीच्या पर्स मधुन अंदाजे एक नोट काढुन त्याच्या हातावर ठेवली ,पाँपकाँर्न ची पिशवी फाडुन काही  तो तीच्या हातावर ठेवायचा तर काही स्वता:च्या तोडांत टाकायचा.
        अस शेअरींग बघुन त्यांच्यातल्या बांडीगच ,एकमेकांना समजुन घेन्याच्या ,सहयोग देन्या  च्या भावनेच अन कृतीच कौतुक वाटत होत.
      पुढच्या स्टाँपला त्यांना उतरायच होत, तशी त्यांची तयारी चालु झाली.तीन बँग खांद्यावर लटकवली ,पिशवी हातात घेतली .तो उठला त्यान तीचा हात हातात घेतला अन आपल्या कुबड्यांच्या सहाय्याने आपल्या अर्धांगीनीला आधार देत खाली उतरला.
       (एवढाच संमजस पणा ,एकमेकांना नबोलताही समजुन घेन्याची कला नार्मल जोडप्यांना अवगत झाली तर कीती संसार वाचतील ,अर्धनारी नटेश्वरा सारखे एकमेकांत सामाउन जातील)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)