मृगतृष्णा
"अश्विनी येना ",अश्विनी अश्विनी .आली येकदची ती.चैन पडेना तीच्या शिवाय. आज अनेक दिवसांनी अजिंक्य तिला असा आवाज देत होता.कळी खुलली,गालवर लाली आली.
आज त्यांच्या लग्नाला पूर्ण दोन वर्ष झाली.आजच्या च दिवशी तिन त्याच्याशी लग्न केल होत.
ती त्याला एका क्लास मधे भेटली होती.
कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांच्या ग्रुपला डांस करायचा होता.त्यात अजिंक्य तिचा पार्टनर होता.दोघांची तुलना करायची असेल तर ती व तो दोघ हि सुन्दर नाचायचे, प्रेसेंटेबल होते.पण एक फरक असा की आश्विन च लग्न झाल होत व अजिंक्य अजून ब्याचलर होता.
एक दिवस तिथे कुणाल आला,आश्विनीचा नवरा.त्याच्या सोबत तिचे वडील ही होते. तिला त्यांनी बाहेर बोलवल. वडिलांनी तिला आत्ताच्या आत्ता घरी चल म्हटल,तर कुणाल तिला हे सगळं नाचण वगैरे सोडुन दयायल सांगत होता.अश्विनी त्यानां मी कहीच सोडणार नाही आणि तुमच्या सोबत तर मुळीच येणार नाही अस सांगत होती. तिच्या नकाराने वडीलांनी तिला एक गालात ठेऊन दिली आणि कुणाल तिला दंडाने पकडून ओढत न्यायला लागला.अश्विनी स्वतला सोडवण्याचा प्रयत्न करत होती,रडत होती.तेव्हा क्लास च्या जोशी बाईनी तिला आपल्या कडे ओढत त्या दोघांना तिथून जायला सांगितलं.अश्विनी च्या वडिलांनी बाईंना,"ती माझी लेक आहे व मी तिला न्यायला आलोय." अस म्हणून तिला परत ओढले.पण जोशी बाईंनी तिला आपल्या कडे घेत,"तीला यायच नहिय मग तुम्ही तिला तीच्या मर्जी शिवाय नेऊ शकणार नाही.नाही तर मी पोलिसां ना बोलवेल." अस निक्षून सांगितले.
एकंदरित त्यांचा पवित्रा बघुन ते दोघे तिथून निघून गेले. जोशी बाई तिला आत घेऊन आल्या.अश्विनी खुप रडत होती.बाईनी तिला शांत केलं.
तिची विचारपुस केली. अश्विनी पाच वर्षा पूर्वीच सांगू लागली.
कुणाल अश्विनीच्या आत्याचा मुलगा.फारस काही करत नव्हता ,बापाची शेती व बियाण्याच दुकान म्हणून घरात लक्ष्मी पाणी भरत होती.
अरूणराव लक्ष्मीचे वडील ,चार मूली आणि एक मूलगा असलेला बाप . परिस्थीती व कष्टाने पिचलेला.
घरची शेती फारस काही देत नव्हती म्हणून दूसरी कडे कामाला जायचे.अडीअडचणीला बहीण लता कुणालची आई मदत करायची .
अश्विनी देखनी, कामसू,संस्कारी म्हणून कुणालच्या मनात भरली,मग आईन त्याच्या साठी भावाला लेक ,सून म्हणून मागीतली. बहिणीच्या उपकारा खाली दबलेल्या अरूणरावांनी लगेच होकार दिला.तस त्याचींही एक जबाबदारी कमी झाली शिवाय लेक श्रीमंत घरात गेली.
अश्विनी लग्नाला तयार नव्हतीच पण मग त्यांनी तीला आपल्या अडचणा सांगून , ते करण्यास भाग पाडले.वडीलांची
अडचण अन लाचारी बघून अश्विनी बोहल्यावर चढली.
त्या घरात तीची घुसमट होत होती. सगळ असून ती सोन्याच्या पिंजरयातील पक्षीणी आपले पंख पसरून उडू पाहत होती.
बरेच दिवस , महिने गेले तीला सासूरवास होऊ लागला, कधी मारहाण,शिवीगाळ .कधी चारित्र्यावर संशय तर कधी वांझ म्हणून तीचा छळ होत होता.
तिन वडीलांच्या कानावर सगळ घातल पण तो बाप समाजातील खोट्या प्रतीष्टे पाई लेकीला आघार देण्या ऐवजी तीला त्या नर्कात सोडून दिल.
पण ऐक दिवस अश्विनी तीथून माहेरी जायला म्हणून निघाली अन एका मैत्रीणी कडे जाऊन राहू लागली.
ईकडे नवरा ,बाप सगळेच तिला शोधत होते .
अश्विनी आपल्या मैत्रीणीच्या मदतीने एका आँफिसात नोकरी करू लागली व तिला नाचायला आवडायच म्हणून डांस क्लासला जाऊ लागली.
बरेच दिवस ती कुठे राहतेय हे तिच्या ना वडीलांना माहीत होते ना नवरयाला.
सगळी बंधन आणि जबाबदारयां पासून मुक्त अश्विनी आपल्या पोटा पूरते कमवून आपला छंद जोपासत होती. नाचन्या बरोबर तिला गाणही आवडायच,जीवनातले सूर हरवले तरी तीन ते तीच्या वेगळ्या वाटेवरून परत मिळवले होते.
यातच तिला नाचण्यात पार्टनर म्हनून मिळालेला अजिक्यं तिच्या अधिक जवळ येवू लागला.तिला समजून घेणारा ,तीच्या सारख्याच आवडीनिवडी असलेला अजिक्यं, अश्विनी त्याच्यात आधार शोधू लागली.
कुठलेही बंधन नसलेले दोघ अधीकच जवळ आले.मग नात्यात पूढे गेलेले ही जोडी लग्न बंधनात अडकली .
जबाबदारी नसतानां गूलूगूलू करणारी राघूमैनाची ही जोडी प्रत्क्षात संसारात पडल्यावर एकमेंकाच्यां चुकां काढून कचाकचा भांडू लागली. अश्विनीवर स्वत:चाच हक्क समजणारा अजिक्य ती कुणाशी बोलली तरी तीच्यावर संशय घेवू लागला . कुणाल च्या तावडीतून सुटलेली अश्विनी आगतीक झाली ,आगीतून फूफाट्यात अशी तिची अवस्था.
ऐकाला सोडून आलेली ती, पण अजिक्यंवरच्या प्रेमापोटी ती त्याच वागण सहन करत होती. नाचन्यात उत्तम म्हणून तिलाही नाच शिकवायच काम मिळाल .घरात पैसा येवू लागला .अश्विनीच नाव होऊ लागल ,तिला परिक्षक म्हणून बोलावणी येऊ लागली,तिचे स्वतंत्र कार्यक्रम होऊ लागले.
तिच्या प्रगतीचा चढता आलेख अजिक्यंचा अहंकार दूखावू लागला.मग तिला मानसीक त्रास देण चालू ठेवल.तिच्या भूतकाळावरून बोलण ,प्रसंगी हातऊगारण.
त्याला व्यसनही लागल होत मग ते पुरवण्या साठीचा पैसा हि अश्विनी कडूनच घेतला जात होता.
प्रेम आंधळ असत आणि त्यात असलेली माफी आणि स्विकार या तत्वांवर अश्विनी अजिक्यला सहन करत होती.
या लग्नाला दोन वर्ष होत आली . उद्या या ल्ग्नाचा वाढदिवस आहे. आपल्या व्यापात व फक्त तिची जबाबदारी म्हणून निभावत असलेल्या या नात्यात अश्विनीला याचा विसर पडला होता.
पण नियती काय दाखवेल याचा आपल्याला काही अंदाजच येत नाही.
म्हणजे झाल अस की रात्री अजिक्य सवई प्रमाणे प्यायला गेला व येतानां जास्त झाली म्हणून अडखळला ते एका गाडी खाली येतायेता राहीला. गाडी वर असलेल्या जोडप्याशी हूज्जत घालत असतांना त्याच्या अवतारा मुळे लोक त्याला मारायला धावले.त्याच्यांतल्या एकाने त्याला ओळखल व इतरां पासून वाचवत बाजूला केल .
लोकांची समजूत घालून त्यांनी अजिक्य त्यांच्या ओळखीचा आहे अस सांगितल. ती व्यक्ती होती अश्विनीच्या क्लासला येणारा उदय.
उदयन अजिक्य ला आपल्या घरी नेल कारण तो त्याच्या घरी जण्याच्या वा पत्ता सांगण्याच्या अवस्थेत नव्हता.
सकाळी उदय न अजिक्यला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
तसा अजिक्य गोधंळला कारण त्याच विश्व याच्या पलीकडे होत. उदयन त्याला रात्रीची हकीकत सांगत तो अश्विनीचा विद्यार्थी असल्याच सांगीतल व त्याला फेसबूक मुळे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसा बद्दल कळल .तसा अजिक्य खाजील झाला पण तस न दाखवत तो त्याचा निरोप घेऊन निघाला. अजिक्य चालत तर होता पण त्याच मन केव्हांच अश्विनी जवळ ,त्यांच्या भूतकाळात गेल होत.
अजिक्यला आपल्या वागण्याची ,असण्याची लाज वाटू लागली. अश्विनीने त्याच्यात शोधलेल प्रेम ,आधार,त्याला त्यान खोट ठरवल होत. तिन त्याच्यावर खर प्रेम केल होत व निभावलही होत.
अजिक्यच्या डोळ्यातन पाणी वााहत होत जणू तो त्याच्या चुकांना धुन्याचा प्रयत्न करत होता . तस ते इतक सोप्प नव्हत पण तरी त्यान स्वत:शीच ठरवल आत्ता सगळ विसरून आश्विनीला आपण तिच हरवलेल प्रेम परत द्यायच त्या साठी आजच्या इतका योग्य दिवस नाही.त्याला परत एक संधी मिळालीय.
अजिक्य न घरात पाऊल टाकताच अश्विनी ,अश्विनी ,त्याच्या विशिष्ट लईत हाक मारली तशी अश्विनी रोमांचीत झाली.ज्या हाकेला ती कधीची आसुसलेली होती ती कानावर पडताच ती धावतच आवाजाच्या दिशेन पळाली ,--------
पण हे मृगजळ तर नसेल ना ? अश्विनीची मृगतृष्णा तिला कुठे नेईल कुणास ठाऊक.

khupch Chan
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवा