मी फायटर
म्हणजे" सप्तंरंग मनातले -----या शिर्षका खाली मी फक्त स्री जीवनातल्या रंगा विषयी ,तिच्या जीवनातील संघर्षा विषयी आणि वेगवेगळ्या स्रीयांच्या वेगवेगळ्या जीवन कहान्यांन विषयी लिहीते.
तसच आज आपण या फोटोतल्या गर्दित ज्या स्त्रीयां बघतोय त्या प्रत्येकीची गोष्ट न्यारीच आहे त्यातली एक मी पूर्वि स्वप्नांन चा पाठलाग यात मांडलाय .तर आज यात ल्या वेगळ्या नायीकां बद्दल बोलूयात.
आपण बरयाचदा अंगणवाडी सेविकां बद्दल ,त्यांच्या मोर्च्यां बद्दल एकतो ,बघतो.तस त्या गरजू असतातच पण त्यांच्या
सेवाही समाजासाठी गांवासाठी जास्तच गरजेच्या असतात.पण त्यांना मिळणारा मोबदला फारच कमि असतो.त्यासाठीच वारंवार त्यांची आंदोलनं चालू असतात.
त्या पैकीच काही अंगणवाडी सेविका आमच्या सोबत प्रवास करत होत्या .प्रत्येकीची कहानी वेगळी.कुणि विध्वा तर कुणि परित्यक्त्या,कुणि कुंटुबाला हातभार लागावा म्हणून हे काम करतात.
आपल्या देशात शारिरीक श्रमाला हवा तसा मोबदला मिळत नाही हे कटू सत्य आहे.काहिंना काही मिंटाचे पैसे मिळतात तेवढे काही श्रमिकांना आयुष्यभर राबूनही मिळत नाही.तेव्हा या लोकांना स्वत:च्या अधिकारां साठी भांडाव लागत तर काही समाजसेवक मंडळी त्यांना ते मिळवून देण्यासाठी संघर्ष करतानां दिसतात.
यांच्या कामाचा व्याप म्हटला तर खुप मोठा असतो . स्वयंपाक, गरोदर माता व लहान बाळांना पोषक आहार ,त्यांच लसिकरण अश्या आघाड्यांवर काम कराव लागत.यात वरिष्टांची मर्जी सांभाळण बरयाचदा अतित्रासाच ठरत.मुकादम असतील तर वेगळीच पिळवणूक.
अश्या बिकट वाटेवर चालणारया प्रत्येकीला तिच्या कष्टाच योग्य फळ मिळाव येवढच.त्यानां परत संघर्ष करावा लागणार नाही अस वाटतय कारण काल- पर्वाच त्यांच्या मानधनात वाढ झाल्याच वाचल.असो, तुमच्या मनात त्यांच्या बद्दल ही संन्मानाची भावना असावी म्हणून त्यांच्या परिस्थीचा हा छोटे खानी आढावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा