झाले मोकळे आकाश
कंठ दाटुन आला
मनी भावनांनचा
कल्लोळ झाला
नाही कुणि जवळ
निजले सारे घर
जाता तोल देहाचा
धडपडले , जख्मि झाले
मनालाही मग थोडे लागले
सावरले मीच मजला
हुंदका मग थांबऊ न शकले
आसवांना वाट मोकळी
भावनांनाचा निचरा
अंधारल्या रात्रीच्या कुशित
शिरून खुप खुप रडले
थोपवाया कोण होते ?
न अश्रू पुसाया
पण जेव्हा मोकळे झाले मन
स्वत:च स्वत: ला सावरले
अग वेडे तुच तर
आई , घराची
मग आधार कुणाचा शोधते
सावरण्याचे बळ सर्वानां
ऐकट्या तुलाच लाभले
ऊठ तु आत्ता ,
करू नको दु:ख
मनाच्या शक्ति सवे
भरले तुझे अस्तित्व
मग लख्ख दिसणारया
माझ्या अनेक भुमिकांचा
आरसा जणू दिसला
सावरलेल्या मना साठी
झाले मग मोकळे आकाश
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा