थकलेल्या' ती 'ची हाक


 भरकटतेय एकटीच 

चाचपडतेय माझ अस काही तरी रोजच्या रहाटगाडयात

मला कुठे माझ अस अवकाश आहे?

अनामिक या वाटां वरती दुसरयांचीच स्वप्ने

     अन माझ्या जबाबदारया 

संपत नाही हे ओझी वाहण ,मी ही थकलेय आता

फक्त उसासे अन सुरकत्यां मधेच तेवढी उरलेय आत्ता

संपवून टाकायच हे सार काही ,

मीच का जळायच ?

 मन मारून मारून जगायच

सकाळी काळजी करत उठायच 

अन तिच्या सोबतच झोपायच 

दिनक्रमात सारया माझ्या साठीच वेळ नसतो

तरी ही काय करते हा मात्र प्रश्न असतोच

लेक , बायको,सुन ,आई नात्याची ती 

भारूड भरती 

या सारया पसारयात माझी मी उरते किती

बस आत्ता चिर निंद्रा 

फक्त फक्त माझ थडग आता मला हवय

आराम शरिर आणि मनाला 

तोही मागावाच का लागतोय

तिथे ही मी माझ आश्रीत होण जपलय

पाश हे सुटतच नाहीत 

धागे बंधनांचे तुटतच नाहीत

मरणाच्या वाटेवर ही

 नात्याची काळजी पाठ सोडतच नाही





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

तु कळलीच नाही जगाला ,देवी म्हणून कोंडली गेलीस उंबरयाच्या आत पण तुला ही घ्यायचा आहे ना मोकळा श्वास

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)