पोस्ट्स

फरपट

      सविता सकाळीच घराबाहेर पडली. जराशी डिस्टर्बच दिसत होती.घरातल्याच साडीत ,हातात पर्स घेऊन ती रिक्षास्टँड वर आली.पुढे कुठे जायच अस काही तिने ठरवल नव्हतच म्हणून तर रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याच्या आवाजाने ती भानावर आली व स्टेशनवर जायच अस सांगताच रिक्षा त्या दिशेने निघाली.       सगळा वृतांत तिच्या समोर आला.    सविता लग्न होऊन पाटलांच्या घरची सुन होऊन आली होती  ,नव्याचे नऊ दिवस लवकरच संपले आणि तिला घरातल्यांची हळूहळू ओळख होऊ लागली.    तसे सगळे पाहूणे गेल्यावर घरात उरली फक्त चार डोकी. सासू सासरे आणि हे दोघ.सासरे निवृत शिक्षक तरी ते कश्यात तरी व्यग्र असायचे व सासूबाईचे आपले दिवसभर घरातली काम व देवपूजा.     या अश्या सालस माणसांचा मुलगा संजू  पण भरकटलेला ,व्यसनाच्या आहारी गेलेला.    घरातला शेवटचा पाहूणा गेला आणि संजू बाहेर गेला ते रात्री बारा नंतर वेगळ्याच अवतारात परतला.    त्याच्या आवाजान दार उघडायला गेली तर दार उघडताच तो तिच्या अंगावर पडला ,सावरल तिन स्वत:ला आणि त्याला ही.     ...

पार्टटाईम नवरा

      उषा आज येणार नाही.असा निरोप रामदासीनीं दिला. इकडे,सुरभीला आँफिसला जायची घाई अन  त्यात उषा येणार नाही चा निरोप म्हणजे  दूष्काळात तेरावा महिना म्हणजे वेळेच्या बाबतीत.    सुरभी थोडी वैतागलीच पण तिला आता उषाची काळजीही वाटू लागली.  आपण  जेवणाच्या सुटीत उषाला फोन करायचा अस  स्वत:शिच ठरवत घरातली महत्वाची काम आटपून ती आँफिसात निघाली.   ठरल्या प्रमाणे सुरभीने उषाला फोन लावला ,फोन किर्ती ने उषाच्या धाकट्या लेकीने उचलला.  "आई कुठे आहे? का आली नाही कामावर ?" सुरभी च्या प्रश्नाला किर्ती न "घरी पाहुणे आलेत, दिदीला बघायला." अस उत्तर दिल.    आता उषाशी बोलता येणार नाही अस स्वत:शिच ठरवून सुरभीन फोन ठेवला.   आँफीस नंतर घरातली उषाचीही काम आटपत सुरभीचा दिवस संपला ,पुन्हा पंलगावर पडताच तिला उषाची आठवण झाली त्यातच थकलेल्या शरिरान मनही नकळत झोपेच्या स्वाधीन झाल.    रोजच्या वेळेवर सुरभीचा दिनक्रम चालू झालाच होता की दारावरची बेल वाजली.   तोंडातला ब्रश तसाच ठेउन तीन दार उघडल तर उषा साडीचा पदर खोचत किचन मधे भा...

मृगतृष्णा

      "अश्विनी येना ",अश्विनी  अश्विनी .आली येकदची ती.चैन पडेना तीच्या शिवाय. आज अनेक दिवसांनी  अजिंक्य तिला असा आवाज देत होता.कळी खुलली,गालवर लाली आली.   आज त्यांच्या लग्नाला पूर्ण दोन वर्ष झाली.आजच्या च दिवशी तिन त्याच्याशी लग्न केल होत.      ती त्याला एका क्लास मधे भेटली होती. कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांच्या ग्रुपला डांस करायचा होता.त्यात अजिंक्य तिचा पार्टनर होता.दोघांची तुलना करायची असेल तर ती व तो दोघ हि  सुन्दर नाचायचे, प्रेसेंटेबल होते.पण एक फरक असा की आश्विन च लग्न झाल होत व अजिंक्य अजून ब्याचलर होता.    एक दिवस तिथे कुणाल आला,आश्विनीचा नवरा.त्याच्या सोबत तिचे वडील ही होते. तिला त्यांनी बाहेर बोलवल. वडिलांनी तिला  आत्ताच्या आत्ता घरी चल म्हटल,तर कुणाल तिला हे सगळं नाचण वगैरे सोडुन दयायल सांगत होता.अश्विनी त्यानां मी कहीच सोडणार नाही आणि तुमच्या सोबत तर मुळीच येणार नाही अस सांगत होती. तिच्या नकाराने वडीलांनी तिला एक गालात ठेऊन दिली आणि कुणाल तिला दंडाने पकडून ओढत न्यायला लागला.अश्विनी स्वतला सोडवण्याचा प्रयत...

प्यार के साईड इफेक्ट

    रात्री  शेजारी बरीच आरडा ओरड चालू होती . भांडी फेकण्याचे आवाज , आदळ आपट ,लेकरांची रडारड. हे दोन चार दिवसात होतच रहायच . योगेशच असच चालायच .तसा तो रोजच दारू पिऊन यायचा .कधी कधी फारच गोडीत चालायच सगळ बायको वर प्रेमाचा वर्षाव,लेकरांचे लाड.अन कधी त्याच्यात राक्षस संचारायचा मग तो मीनाला, त्याची बायको  मारमार मारायचा .केस धरून डोक  भिंतीवर,दारावर आपटायचा.सीगरेट चे चटके , शिव्यातर विचारूच नका .मधे पडणारया माणसा ला ही तो सोडत नव्हता .तीची बाजू घेणारया पूरषांवर संशय घ्यायचा,बायकानां ही नाही तस बोलायचा मग मीनाच सगळ्यानां त्याच्यांत पडू नका म्हणूव सांगायची.    त्याही दिवशी बरीच रात्र झाली म्हणून सगळेच आपापल्या घरात जाऊन झोपले पण आतही बराच वेळ गोधंळ चालू होता.       सकाळी रोजच्या सवईने समोर दूध आणायला गेले तर  मीना सोनू आणि चिंटू ला घेऊन येत होती . मग हळू हळू दोघी तिघी जमल्या .मीना ला विचारल येवढ्या सकाळी तू कुठे गेली होतीस ?       तर तीन आंवढा गिळून बोलायचा  प्रयत्न केला ,सगळ्यानीं तिला धीर दिला ,रात्री पासून भुकेली...

शबनम

      आज शबनम दिसली नाही म्हणुन ,बाईंनी तीच्या जवळ बसणारया गीता ला विचारल,ती का आली नाही? तेव्हा गीता म्हणाली ,बाई काय माहीत ,ती बरयाचदा अपसेंन्ट असते.            दोन दिवसांनी शबनम काँलेजला आली, बाईंनी विचारल का आली नव्हती दोन दिवस?     शबनम ने आजारी असल्याच कारण दिल.      शबनम अभ्यासात अतीशय हुशार होती पण ती नेहमीच हरवलेली ,नाराज ,उदास असायची.          एक दिवस ती अचानक वर्गात चक्कर येउन पडली ,बाईंनी मुलींच्या मदतीने तीला स्टाफ रुम मध्ये नेल.तीची वाईट अवस्था बघुन ,बाईंनी जवळ राहणारया ओळखीच्या डाँक्टरांना बोलवल.           डाँक्टरांनी तपासल्यावर तीला अशक्त पणामुळे चक्कर आली अस सांगीतल. तीला तीथेच आराम करायला सांगुन बाई त्या डाँक्टरांना घेउन आपल्या केबीन मध्ये गेल्या ,  तीथे डाँक्टरांनी शबनम ला दिवस गेल्याच बाईंना सांगीतल. हे एकून बाईंना एकदम धक्काच बसला.              आज बाई शबनमला स्वत: घरी सोडायला गेल्या. बाईंनी तीच्या घ...

मेरे घर आई एक नन्ही परी

      आज ती आली  अखेरीस  जीची  सगळेच खुप आतुरतेन वाट बघत होते.        ती आज मागचे सगळे पाश तोडुन आली होती जन्म दात्या आईला व तीच्या सोबत या जगात आलेल्या भावाला.      सीमा आणि अरुण ची ही जुळी लेकर , ती जगात यायच्या आधीच  नियतीन या लेकरांचा बाप हिराउन घेतला.    सीमा ची या आधीच दोन मुल होती त्यात अरुण च्या अचानक जाण्याने आधीची दोन आणि आत्ता ही जुळी ,तीला या चौघांच संगोपण उत्तम रित्या करन व्यवहारीक दृष्ट्या शक्य नव्हत तेव्हा तीला तीच्या भावान ही मुल दत्तक द्यायचा सल्ला दिला.   एका आई साठी हा निर्णय घेण सोप नव्हत, पण तीचा हा निर्णय तीच व या चारही लेकरांच पुढच आयुष्य सुकर करायला योग्य ठरणार होता .    अरुणच्या एका मित्राची  बायको अश्या जोडप्यांना ओळखत होती जे मुलं व्हावीत म्हणुन अनेक वर्ष प्रयत्न करत होते पण त्यांना यश येत नव्हत व शेवटी मुल दत्तक घेण्याच्या निर्णय त्यांनी घेतला होता.तीन त्यां दोन जोडप्यानां संपर्क केला ,त्यांना सगळी परीस्थीती सांगीतली .त्या जोडप्यांनी तयारी दाखवली  . ...

अर्धांगिनी

           शेजारच्या सीटवर एक जोडप बसल होत,ती अंध अन तो अपंग बहुतेक पोलीयो ग्रस्त.          गाडी सुरू होताच त्यान पुडी काढली ,हातावर अंदाजाने तंबाखु घेतला आणि थोडा चुना घेवुन चांगला चोळला अर्थात तंबाखु खाणारयाच ठाउक तो कीती अन कसा चोळायचा मी आपल माझ निरीक्षण वर्णन केल.       असो, नंतर त्यान तो थोडा तीच्या हातावर ठेवला अन थोडा आपल्या गालात कोंबला .       मला आपली मजा वाटली, एरवी बायकोच काय ते नवरयाच्या हातात आयत देत असते आयत! हा सर्वसामान्य भारतीयांचा पायंडा.          ते बहुतेक कुठल्या तरी सवलती साठी अर्ज करायला जात असा असावेत अस एकंदरीत त्यांच्या गप्पां वरून वाटल.     हो दुसरयाच्या गप्पा ,बोलण ऐकण चुकीचय मला माहीत आहे  पण हे सहजच कानावर पडत होत अन पुस्तक वाचना बरोबर माणस वाचायची चटक लागलीय त्या शिवाय का तुमच्याशी हे शेअर करता येतय?        तो तीला विचारत होता ,"तुझा दाखला घेतलाय का ?"  "डाँक्टर न दिलेला कागद ,आधार कार्ड घेतलय?" ...