पोस्ट्स

मी फायटर

इमेज
आपण या बद्दल आधिही बोललोय का?  म्हणजे" सप्तंरंग मनातले  -----या शिर्षका खाली मी फक्त स्री  जीवनातल्या  रंगा विषयी ,तिच्या जीवनातील संघर्षा विषयी आणि  वेगवेगळ्या स्रीयांच्या वेगवेगळ्या जीवन कहान्यांन विषयी लिहीते.       तसच आज आपण या फोटोतल्या गर्दित ज्या स्त्रीयां बघतोय त्या प्रत्येकीची गोष्ट न्यारीच आहे त्यातली एक मी पूर्वि स्वप्नांन चा पाठलाग यात मांडलाय .तर आज यात ल्या वेगळ्या नायीकां बद्दल बोलूयात. आपण बरयाचदा अंगणवाडी सेविकां बद्दल ,त्यांच्या मोर्च्यां बद्दल  एकतो ,बघतो.तस त्या गरजू असतातच पण त्यांच्या  सेवाही समाजासाठी गांवासाठी जास्तच गरजेच्या असतात.पण त्यांना मिळणारा मोबदला फारच कमि असतो.त्यासाठीच वारंवार त्यांची आंदोलनं चालू असतात. त्या पैकीच काही अंगणवाडी सेविका आमच्या सोबत प्रवास करत होत्या .प्रत्येकीची कहानी वेगळी.कुणि विध्वा तर कुणि परित्यक्त्या,कुणि कुंटुबाला हातभार लागावा म्हणून हे काम करतात. आपल्या देशात शारिरीक श्रमाला हवा तसा मोबदला मिळत नाही हे कटू सत्य आहे.काहिंना काही मिंटाचे पैसे मिळतात तेवढे काही श्रमिकांना आयुष्यभ...

मॅडम

इमेज
   शिक्षक त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळेतला म्हणजे सगळा सावळा गोंधळ असच काहीस आपल्या सामान्यांच मत असत. त्यात बिचारयानां मध्यांन भोजन ,खिचडी वाटप कधि जनगणना अशी जास्तीची काम दिली जातात मग विद्यार्थ्याच्या मुळ विकासा कडे ते शिक्षक कसे लक्ष देतिल . पण याला काही अपवाद असतात जे मुलांना शिकवण्या पलीकडे त्यांच्या इतर गरजा कश्या पुर्ण होतिल या कडे ही लक्ष देतात व वेळोवेळी त्या पूर्ण ही करतात. तशीच एक शिक्षीका म्हणजे मुन्ना देशमुख मॅडम . जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी मुल म्हणजे साधारण घरातली मुल जिथे प्राथमिक गरजाच मोठ्या कष्टाने पूर्ण होतात त्यात या मॅडम शिकवत असलेल्या शाळेतली मुल ऊसतोड कामगांराची .ज्यानां शाळेत वर्षभर हजर असणच मुश्किल पण मुन्ना मॅडम सारखी शिक्षीका जी  मुलांच्या  घरी जाऊन ,त्यांच्या पालकानां समजाऊन ,त्यानां जीवलाऊन शाळेत यायला प्रेरित करते ,एवढच नाही तर त्यांच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करते. त्यां  मुलाच्या वैयक्तिक अडचणी समजून घेऊन त्यातून मार्ग काढते/दाखवते. त्यांच्या शैक्षणिक प्रगति बरोबर त्यांच्या सर्वांगिण विकासा कडेही लक्ष देते .मुलांन मधले स...

स्वाभीमान आणि भूक

     करोनाच्या कहराच्या गोष्टीं नी सार जग व्यापलय पण त्यासोबत आलेल्या लाॅकडाऊन मुळे अनेक प्रभावीत झालेत.कामधंद्ये बंद ,जिथे मोठ्यांना याची झळ बसलीय तिथे रोजच कमवून खाणारयांच विचारायलाच नको.        काहीनां सरकारी मदत मिळाली तर काहीनां समाजभान अललेल्या संस्था वा दानशूर लोकांनी कुठे महिन्याच राशन दिल तर कुठे दोन वेळच जेवण पुरवल.यातही बरीच मंडळी या कुठल्याच मदती  विना  वंचीत ठरली .    एक तर त्यांच्या पर्यंत कुणिच पोहचल नाही किंवा कुठे काही मिळत त्याची माहीतीच नाही.     मागायला जायच तरी कुठे ? अशीच एक दोन लेकरांची आई आज आली .लेकरांना खायला काही तरी दे, म्हणून गळ घालायला लागली.    ती जवळच राहणारी कोमटी (जे जुने कपडे घेऊन भांडी देतात)स्त्री होती . ती नेहमीच दारावरून जायची ,तशी तीची आणि माझी ओळख पाच,सहा वर्षा पुर्विची . अंगान बारीक कुपोशित वर्गात मोडणारी ,पहिल्या वेळी गरोदर होती तेव्हा ही सासू लांबून पाणी आणायला पाठवायची,मोठ्ठे हंड्डे डोक्यावर , पुढे आलेल पोट आणि बारीक झालेले हातपाय.खुप दया यायची तिची आणि तिच्या सा...

स्वप्नांचा पाठलाग

इमेज
    प्रवास खुप काही देत असतो मग तो जीवनात येणारा छोटा,मोठा प्रवास वा संपूर्ण आयुष्याचा प्रवास असो.असतात चढउतार , अडचणी पण त्या शिकवून जातात बरच काही किंवा नव्याने आपलीच आपल्याशी ओळख करून देतात.     त्या दिवशी रिजर्वेशन मिळाल नाही म्हणून लेडीज डब्यात बसले,प्रवास चाळीसगांव ते अमरावती.प्रचंड गर्दी,त्यात लेडीज डबा लहानआणि इतर कुठे चान्स मिळाला नाही म्हणून काही पुरूषही त्यात चढले . दारातल्या बायकांनी ढकलल्या मुळेच आम्ही आत आलो खरतर.रिजर्वेशन न मिळाल्याने पण जाण गरजेच असल्या मुळे सगळ्या स्तरातल्या व पदावरच्या लेडीज भारताच्या विविधतेच दर्शन घडवत प्रवास करत होत्या त्या डब्यात.           अंगणवाडी सेविका पुण्यात मानधन वाढवण्या साठीच्या मोर्चात सामिल होवून परत निघाल्या होत्या , बांधकामावर मजूर म्हणून काम करणारया, शिक्षीका,माझ्या सारख्या गृहीणी,TLC मध्ये काम करणारी इंजीनियर , खुप नटलेल्या पण बुरखाधारी मुस्लीम स्रिया ते OxFerd ला Phd साठी चाललेली एक आई.        आपण आज या आई बद्दल बोलुया. ऐवढ्या गर्दीत तिन खाली बसून पुस्तक वाचायला घ...

फरपट

      सविता सकाळीच घराबाहेर पडली. जराशी डिस्टर्बच दिसत होती.घरातल्याच साडीत ,हातात पर्स घेऊन ती रिक्षास्टँड वर आली.पुढे कुठे जायच अस काही तिने ठरवल नव्हतच म्हणून तर रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्याच्या आवाजाने ती भानावर आली व स्टेशनवर जायच अस सांगताच रिक्षा त्या दिशेने निघाली.       सगळा वृतांत तिच्या समोर आला.    सविता लग्न होऊन पाटलांच्या घरची सुन होऊन आली होती  ,नव्याचे नऊ दिवस लवकरच संपले आणि तिला घरातल्यांची हळूहळू ओळख होऊ लागली.    तसे सगळे पाहूणे गेल्यावर घरात उरली फक्त चार डोकी. सासू सासरे आणि हे दोघ.सासरे निवृत शिक्षक तरी ते कश्यात तरी व्यग्र असायचे व सासूबाईचे आपले दिवसभर घरातली काम व देवपूजा.     या अश्या सालस माणसांचा मुलगा संजू  पण भरकटलेला ,व्यसनाच्या आहारी गेलेला.    घरातला शेवटचा पाहूणा गेला आणि संजू बाहेर गेला ते रात्री बारा नंतर वेगळ्याच अवतारात परतला.    त्याच्या आवाजान दार उघडायला गेली तर दार उघडताच तो तिच्या अंगावर पडला ,सावरल तिन स्वत:ला आणि त्याला ही.     ...

पार्टटाईम नवरा

      उषा आज येणार नाही.असा निरोप रामदासीनीं दिला. इकडे,सुरभीला आँफिसला जायची घाई अन  त्यात उषा येणार नाही चा निरोप म्हणजे  दूष्काळात तेरावा महिना म्हणजे वेळेच्या बाबतीत.    सुरभी थोडी वैतागलीच पण तिला आता उषाची काळजीही वाटू लागली.  आपण  जेवणाच्या सुटीत उषाला फोन करायचा अस  स्वत:शिच ठरवत घरातली महत्वाची काम आटपून ती आँफिसात निघाली.   ठरल्या प्रमाणे सुरभीने उषाला फोन लावला ,फोन किर्ती ने उषाच्या धाकट्या लेकीने उचलला.  "आई कुठे आहे? का आली नाही कामावर ?" सुरभी च्या प्रश्नाला किर्ती न "घरी पाहुणे आलेत, दिदीला बघायला." अस उत्तर दिल.    आता उषाशी बोलता येणार नाही अस स्वत:शिच ठरवून सुरभीन फोन ठेवला.   आँफीस नंतर घरातली उषाचीही काम आटपत सुरभीचा दिवस संपला ,पुन्हा पंलगावर पडताच तिला उषाची आठवण झाली त्यातच थकलेल्या शरिरान मनही नकळत झोपेच्या स्वाधीन झाल.    रोजच्या वेळेवर सुरभीचा दिनक्रम चालू झालाच होता की दारावरची बेल वाजली.   तोंडातला ब्रश तसाच ठेउन तीन दार उघडल तर उषा साडीचा पदर खोचत किचन मधे भा...

मृगतृष्णा

      "अश्विनी येना ",अश्विनी  अश्विनी .आली येकदची ती.चैन पडेना तीच्या शिवाय. आज अनेक दिवसांनी  अजिंक्य तिला असा आवाज देत होता.कळी खुलली,गालवर लाली आली.   आज त्यांच्या लग्नाला पूर्ण दोन वर्ष झाली.आजच्या च दिवशी तिन त्याच्याशी लग्न केल होत.      ती त्याला एका क्लास मधे भेटली होती. कुठल्या तरी कार्यक्रमात त्यांच्या ग्रुपला डांस करायचा होता.त्यात अजिंक्य तिचा पार्टनर होता.दोघांची तुलना करायची असेल तर ती व तो दोघ हि  सुन्दर नाचायचे, प्रेसेंटेबल होते.पण एक फरक असा की आश्विन च लग्न झाल होत व अजिंक्य अजून ब्याचलर होता.    एक दिवस तिथे कुणाल आला,आश्विनीचा नवरा.त्याच्या सोबत तिचे वडील ही होते. तिला त्यांनी बाहेर बोलवल. वडिलांनी तिला  आत्ताच्या आत्ता घरी चल म्हटल,तर कुणाल तिला हे सगळं नाचण वगैरे सोडुन दयायल सांगत होता.अश्विनी त्यानां मी कहीच सोडणार नाही आणि तुमच्या सोबत तर मुळीच येणार नाही अस सांगत होती. तिच्या नकाराने वडीलांनी तिला एक गालात ठेऊन दिली आणि कुणाल तिला दंडाने पकडून ओढत न्यायला लागला.अश्विनी स्वतला सोडवण्याचा प्रयत...