पोस्ट्स

लेकीं साठी ची स्वप्न बदलू लागली

इमेज
       सावित्रीबाईनीं मुलीं साठी शिक्षणाची दार उघडली  1848 मधे.त्या नंतर तर आजपावेतो बरीच दार आपल्या साठी उघडली गेलीत . ति उघडण्याचा वेग खुपच हळु आहे खरतर. म्हणजे बघा 170/171वर्ष झालीत या घटनेला . पण सगळ्याच मुलींना अजुनही त्यांच्या स्वत:च्या विकासा साठी त्यांना हव ते शिकायची परवानगी नाही. इतकच काय पण सगळ्याच मुलींना अजुनही शिक्षणाच्या संधी उपलब्ध नाहीत .      सगळेच बदल सामाजिक उतरंडी नुसार म्हणजे उच्चवर्गा कडून खालच्या स्थरातिल नागरिकां मधे घडुन येतानां दिसुन येतात.       मग ते सोहळे साजरे करण असो ,खानपानाच्या सवई असोत,फॅशन असो किंवा परिवर्तन असो .    आपल्या देशात पौराणिक काळा पासुनच स्त्रिया शिकत पण त्या विशिष्ट वर्गातल्याच.आजच्या सारख सर्वांसाठी शिक्षण नव्हत.मग त्या स्त्रिया असोत कि अजुन कुठल्या दृष्टीने खालच्या दर्जाचा ठरवला गेलेला सामाजातिल एक घटक.      एकलव्य आणि कर्ण यांच्या वर या बाबतित झालेला अन्याय सर्वश्रृत आहे.      नंतर राजे महाराजांच्या काळात पण बरयाच राजकन्या शिकल्यात . तरी जसा ...

थकलेल्या' ती 'ची हाक

इमेज
 भरकटतेय एकटीच  चाचपडतेय माझ अस काही तरी रोजच्या रहाटगाडयात मला कुठे माझ अस अवकाश आहे? अनामिक या वाटां वरती दुसरयांचीच स्वप्ने      अन माझ्या जबाबदारया  संपत नाही हे ओझी वाहण ,मी ही थकलेय आता फक्त उसासे अन सुरकत्यां मधेच तेवढी उरलेय आत्ता संपवून टाकायच हे सार काही , मीच का जळायच ?  मन मारून मारून जगायच सकाळी काळजी करत उठायच  अन तिच्या सोबतच झोपायच  दिनक्रमात सारया माझ्या साठीच वेळ नसतो तरी ही काय करते हा मात्र प्रश्न असतोच लेक , बायको,सुन ,आई नात्याची ती  भारूड भरती  या सारया पसारयात माझी मी उरते किती बस आत्ता चिर निंद्रा  फक्त फक्त माझ थडग आता मला हवय आराम शरिर आणि मनाला  तोही मागावाच का लागतोय तिथे ही मी माझ आश्रीत होण जपलय पाश हे सुटतच नाहीत  धागे बंधनांचे तुटतच नाहीत मरणाच्या वाटेवर ही  नात्याची काळजी पाठ सोडतच नाही

निस्वार्थ मदतिचा योग्य पुरस्कार

इमेज
          एक अशिक्षीत गरिब स्री ,जी कुठलाही विचार न करता अनोळखी मुलिला लवकर उपचार मिळावे म्हणून स्वत:च्या  अंगावरची साडी काढून देते , हा माणुसकी जिवंत असल्याचा दाखला व तिला तिच्या या कार्या साठी हा पुरस्कार दिला जातोय हे आपल्या निस्वार्थ कार्याची दखल कुठेतरी कुणितरी घेत असत याच उत्तम उदाहरण .            खरतर त्या अपघाताच्या घटने नंतर जस माध्यमां द्वारे हे आपल्या पर्यंत पोहचल त्या नंतर विमल बाई व त्या वेळी त्या वैमानिक मुलिला  अनेक कि .मी . पायी चालत उपचारा साठी नेणारया युवकांना  अनेक मंडळींनी बक्षीस दिलीत ,त्यांचे सत्कार झालेत.       यात विशेष सांगायच कि शहरातल्या मोबाईल वेड्यां सारखे ते बघे झाले नाहीत आणि स्वत: केलेलेल्या मदतिचा गवगवा करत लाईक्स च्या भानगडीतही पडले नाही.            पण तरीहि त्यांच्या कामाला प्रसिध्दि मिळाली आणि सन्मानही जो तात्पुरता नाहीय.     हि निरागस ,भोळी माणस आपल माणुसपण जपुन जगत असतात ,आपल्या सारखे स्वार्थ आणि दिखाऊ पणा पासून लांब .   ...

लेक सखी(dedicated to all the moms & daughters, a beautiful relation in universe)

इमेज
 लेक सांगते माझी कथा  जणू समोर हा आरसा कंठ दाटून हा येतो जेव्हा मनीचे गुपित  ति सांगते न बोलता एक एक क्षण नेई जणू मागे हा आरसा  पोटी आल लेण सुरेख  देते आनंदाचा वसा लेक सखी होते सख्खी माझी कळे तिला व्यथा अंतरीची शब्दांविना संवाद चाले मनिचा मनात कधि डोळ्यांची ति भाषा डोळ्यातच हसण होई  अन अश्रृशिवाय रडण नाळ नाळेशी जुळली  मने मनात गुंतली मायलेकिच्या नात्याची सुंदर भावना गुंफली.
इमेज
 लेकी गाण  लेकी गुण लेकी हसू लेकी आसू लेकी ओढ  लेकी विरह लेकी छंद  लेकी गंध लेकी चंचल चैतन्य लेकी हरीणी  लेकी शेरणी लेकी गौरव  लेकी भेट  लेकी ठेव लेकी सावली लेकी माऊली लेकी आनंदाच सुदंर कोंदन लेकी माझ मलाच पाहण.   

लेक सावित्रिची

इमेज
    मी लेक सावित्रीची धरलि कास विद्येची हाति घेत खुरप घेतली लेखणी बी आत्ता घर संसार संभाळून हातभार लावला धन्याला हाता मंदी माया आत्ता नवि ताकदच आली अग्यानाच्या अंधारातून म्या उभारी घेतली नव्या नव्या वाटेवर नवे नवे आव्हान माय सवित्री तुच मले दिले नवे हे  आभाळ

झाले मोकळे आकाश

      कंठ दाटुन आला        मनी भावनांनचा        कल्लोळ झाला       नाही कुणि जवळ        निजले सारे घर         जाता तोल देहाचा धडपडले , जख्मि झाले  मनालाही मग थोडे लागले सावरले मीच मजला हुंदका मग थांबऊ न शकले आसवांना वाट मोकळी  भावनांनाचा निचरा   अंधारल्या रात्रीच्या कुशित      शिरून खुप खुप रडले    थोपवाया कोण होते ? न अश्रू पुसाया    पण जेव्हा मोकळे झाले मन    स्वत:च स्वत: ला सावरले    अग वेडे तुच तर   आई , घराची    मग आधार कुणाचा शोधते    सावरण्याचे बळ सर्वानां  ऐकट्या तुलाच लाभले ऊठ तु आत्ता , करू नको दु:ख मनाच्या शक्ति सवे  भरले तुझे अस्तित्व मग लख्ख दिसणारया  माझ्या अनेक भुमिकांचा आरसा जणू दिसला  सावरलेल्या मना साठी झाले मग मोकळे आकाश